महसूल प्रशासनाचा दलालांवर वरदहस्त?

By Anant Mane

Twitter: @manemilind70

महाड: ऐतिहासिक किल्ले रायगडच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी (Shivaji Maharaj) धनगर समाजाला दिलेल्या जमिनींना आज सोन्याचा भाव आला असल्याने अशिक्षित धनगर समाजाला फसवून जमिनी बळकवण्याचा गोरख धंदा काही दलालांनी चालविला आहे. त्यामुळे धनगर समाज (Dhangar community) आक्रमक झाला असून प्रशासनाने याची गंभीर दखल न घेतल्यास आंदोलन करू, असा इशारा किल्ले रायगडच्या पायथ्याशी असणाऱ्या धनगर समाजाने दिला आहे

ऐतिहासिक किल्ले रायगडच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून असलेल्या धनगर समाजाला त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी जमिनी इनामी दिल्या होत्या. या जमिनींना आज सोन्याची किंमत येत असल्याने दलाल मंडळी महसूल खात्याच्या प्रशासनाला (revenue department) हाताशी धरून व अशिक्षित धनगर समाजातील वयोवृद्ध व्यक्तींना फसवून जमिनी लाटण्याचा (land grabbing by dalals) धंदा अनेक दलाल मंडळींनी चालविला आहे.

ऐतिहासिक रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या पाचाड ग्रामपंचायत हद्दीमधील बाऊनवाडी हे गाव किल्ले रायगडपासून (Raigad Fort) हाकेच्या अंतरावर असून माणगाव ते रायगड हा रस्ता प्रशस्त झाल्याने या बाऊनवाडी गावाजवळील जमिनीला सोन्याचा भाव आला आहे. या जमिनी संपूर्णपणे धनगर समाजाच्या मालकीच्या आहेत. सखुबाई धाकू अवकीरकर व झिंगाबाई धाऊ अवकीरकर या दोन्ही बहिणी वयोवृद्ध असून त्यांच्या अज्ञानपणाचा फायदा घेत त्यांच्या बाऊनवाडी येथील सर्वे नंबर (589 व 589 /अ) येथील पारंपारिक जमिनीवर शिराज युनूस सय्यद, राहणार पाचाड याने बेकायदेशीररित्या कब्जा करण्यास सुरुवात केली आहे.

याबाबत अवकीरकर कुटुंबीयांनी महाड येथील तहसीलदार कार्यालय, प्रांताधिकारी कार्यालय, तालुका पोलीस ठाणे तसेच रायगड जिल्हाधिकारी कार्यालय यांना शिराज युनूस सय्यद या व्यक्तीवर तातडीने कारवाई करण्याचे लेखी निवेदन दिले आहे. मात्र, प्रशासनातील अधिकारी जमीन हडप करणाऱ्या दलालांना पाठीशी घालत असल्याने धनगर समाज आक्रमक झाला आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here