मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांचा दावा

By Anant Nalawade

Twitter: @nalawadeanant

मुंबई: शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते व माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे अभ्यास करून बोलतील अशी अपेक्षा होती. पण ते एखाद्या निर्बुद्धासारखे बोलत आहेत, हे दुर्दैव असून एका युवा कार्यकर्त्याने काही प्राथमिक गोष्टींचा अभ्यास करून बोलावे, हे अभिप्रेत आहे. पण त्यांचे बोलणे ऐकल्यावर त्यांना प्राथमिक शाळेत परत पाठवावे लागेल, अशाप्रकारे निर्बुद्ध असे त्यांचे बोलणे आहे, अशी खरमरीत टीका भाजप नेते व मुंबई भाजप अध्यक्ष ॲड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी शनिवारी येथे एका पत्रकार परिषदेत बोलताना केली.

मेट्रो ३, ६ आणि १० यांचे एकत्रित कारशेड असावे, ही भूमिका आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) तुमच्या सरकारची होती. यासाठी तुमच्या पिताश्रींनी (माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे) (Uddhav Thackeray) एक समिती नेमली. त्याचे सौनिक समिती असे नाव होते. त्या समितीचा अहवाल स्पष्टपणे सांगत होता की, मेट्रो तीनचे कारशेड आरेमध्येच (Metro Carshed in Aarey) करणे सोयीस्कर आहे. हा अहवाल तुमच्या पिताश्रींनी नेमलेल्या समितीचाच आहे. आरेमध्ये कारशेडसाठी केलेला खर्च पाण्यात घालून कांजूरमार्गमध्ये (Kanjur Marg)  सर्वांचे कारशेड बांधण्याचा खर्च वेगळा करावा लागला असता. यात अक्कल आणि शहाणपणा कुठे आहे.? असा सवालही शेलार यांनी यावेळी उपस्थित केला.

कुठल्याही प्रकल्पासाठी शासकीय आणि आर्थिक पातळीवर परवडतील असे निर्णय घ्यायचे असतात. जागा मिळाली तिथे कारशेड करा, हे धोरण अहंकारी असे सांगत, आज आरेचे कारशेड पूर्ण झाल्यामुळे वर्षाअखेरीस मिळणारी मेट्रो ठाकरेंच्या अहंकारामुळे मिळालीच नसती. ठाकरे पिता-पुत्रांच्या अहंकारामुळे दररोज साडे पाच कोटींचे नुकसान मागच्या अडीच वर्षांपासून होते आहे. हा दररोजचा साडे पाच कोटींचा तोटा ठाकरे पिता-पुत्र कोणत्या कोषातून देणार आहेत, याचे उत्तरही त्यांनी द्यावे, अशी विचारणाही त्यांनी यावेळी केली.

आरे मधील १५ एकरच्या बाबतीत आताच्या सरकारने घेतलेली भूमिका व्यवहार्यता तपासून घेतलेली आहे. मेट्रो ३ चे काम पूर्ण होऊन अन्य कामाला मदत करणारी आहे. दररोजचा साडे पाच कोटीचा तोटा भरून काढणारी आहे. आरेमध्ये आणि इंटिग्रेटेडमध्ये नव्याने झालेला खर्च यापासून वाचविणारी अशी राज्य सरकारची भूमिका आहे. आदित्य ठाकरेंना हवे असल्यास मी त्यांना ट्युशन द्यायला तयार असल्याचा खोचक सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here