By Milind Mane

Twitter: @manemilind70

महाड: मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड शहरानाजिक नातेखिंडजवळ सकाळी नऊच्या सुमारास मुंबई – महाबळेश्वर एसटी बस आणि एका डंपरमध्ये सामोरा समोर जोरदार धडक झाली. या अपघातात एस.टी. चालक आणि डंपर चालकासह अन्य २२ प्रवासी असे एकूण २४ प्रवासी जखमी झाले आहेत.

मुंबई आगारातून पहाटे ४:४५ वाजता सुटणारी मुंबई – महाबळेश्वर बस (क्रमांक एम. एच. १४ – बी टी- ३०८२)  नातेखिंड येथे सकाळी ९:४५ वाजता समोरून येणाऱ्या म्हणजे मुंबई दिशेला जाणाऱ्या एका डंपरला (क्रमांक एम. एच. ०६ – बी वी – ५२००) धडकली. हा अपघात एवढा भीषण होता की एसटीच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले आहे. दोन्ही वाहने महामार्गाच्या मध्यभागी अडकून पडली होती. त्यामुळे काही काळ महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

या अपघातात सिद्धार्थ राजेंद्र जंगम (एसटी चालक – ३१ रा. बांधन अलिबाग), उमेश दत्तात्रय शिंगटे -३५ रा. सळवल सातारा, अजित बाळ पाटील – ५१ रा.पेण, विमल महेश शिगवण – ४० रा. तळेगाव माणगाव, कलंदर जरुद्दीन कुवारे – ३८ रा. नागोठणे, शांती दगडू भोसले – ७० रा. देवळी माणगाव, उमेश बळीराम खैर – ४२ रा.कोलाड, सुनील सुदाम रसाळ – ५१ रा. सापे महाड, नमिता गोविंद वाघमारे – ६० रा. तळेगाव माणगाव, कविता नरेश मानंद – ३८ रा. देवळी माणगाव, सविता आदेश भोसले -३१ रा. देवळी माणगाव, लतिका लक्ष्मण शिंदे- ४५ रा. छत्री निजामपूर महाड, अलमास असीम कुवारे – ३६ रा.नागोठणे, अफोज अजीज कुवारे – ३६ रा. नागोठणे, अब्दुल रहेमान आसिफ कुवारे – ७ रा. नागोठणे, सविता सखाराम शिर्के – ५० रा. चिंचवली माणगाव, महमद शहा अब्दुल अजीज कुवारे -१० रा. नागोठणे, मरियम अब्दुल अजीज कुवारे – १२ रा. नागोठणे, फातिमा आसिफ कुवारे.- ३ रा. नागोठणे, भारती लक्ष्मण हिरवे – १७ रा. रानसई पेण, दीपाली लक्ष्मण हिरवे – २० रा. रानसई, शर्वरी अनंत कासार – २० रा. मुंबई गोरेगाव, आप्पा पोपट चव्हाण – ३४ रा. बरड सातारा, असे २४ प्रवासी जखमी झाले.

अपघात झाला त्या वेळी एसटी मध्ये ४० प्रवासी होते. अपघातानंतर सर्व जखमींवर महाड ग्रामीण रुग्णालयात तसेच खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. अपघाताची खबर मिळताच महामार्ग वाहतूक शाखा पोलीस महाड आणि महाड शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तातडीने जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करून अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या साहाय्याने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here