X : @milindmane70

महाड: महाड – विन्हेरे राज्यमार्गावर रात्री एक वाजण्याच्या सुमारास रस्त्यावर गुरे आडवी आल्याने अचानक ब्रेक लावून झालेल्या अपघातात ईरटीका कार जागेवर उलटली. या अपघातात सहा जण जखमी झाल्याची घटना महाड जवळील शिरगाव गावाच्या हद्दीत घडली.

वसई येथून (एम एच 47/ एजी 66 10) या ईरटीका कारमधून प्रवास करीत असताना महाड जवळील शिरगाव ग्रामपंचायत गोमंतक जवळ रस्त्यावर अचानक गुरे आडवी आली. त्यामुळे कार चालकाने ब्रेक लावल्याने झालेल्या अपघातात कार जागेवर पलटली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांची नावे पुढीलप्रमाणे : सागर वसंत गुंजाळ (30) राहणार अंधेरी, रोशन कृष्ण मोहन त्रिपाठी (28) राहणार वसई, सोनू राजाराम पटेल (30) राहणार वसई, राजेश मुकुंद निर्भवते (50) राहणार गोरेगाव मुंबई, पंकज प्रकाश पवार (50) राहणार गोरेगाव मुंबई आणि देवदत्त वासुदेव घाटी (30) राहणार विरार. या जखमींना महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आपघताचा तपास पोलीस निरीक्षक तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार लांडगे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here