@maharashtracity

महिनाभरातील दुसरी घटना

महाड (रायगड): महाड तालुक्यातील वरंध गावामध्ये थकित विज बिल वसुली करता गेलेल्या महावितरणच्या (Mahavitaran) बाह्य स्थित वायरमनला (wireman) मारहाण करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा महाडमध्ये (Mahad) थकीत वीज वसुली पथकाने वीज मीटर काढून घेण्याचा प्रयत्न केला असता या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की झाली आहे. याबाबत शहर पोलिस ठाण्यात (Mahad Police station) तक्रार दाखल झाली आहे.

दिनांक 23 जानेवारी रोजी वरंध गावातील राजेंद्र वसंत धनावडे यांच्याकडे 45 दिवसाच्या वरील थकबाकी असल्याने वायरमन समीर एकनाथ मोरे गेले असता धनावडे यांनी शिवीगाळ आणि मारहाण केली होती.

ही घटना ताजी असतानाच आज दिनांक 29 जानेवारी रोजी महाड शहरातील सिटी गार्डन अपार्टमेंट मधील तुषार सुरेश आठवले या ग्राहकाचा वीज पुरवठा खंडीत करण्यास गेलेल्या कर्मचाऱ्यांना या ग्राहकाने धक्काबुक्की केली.

याबाबत महावितरणचे कर्मचारी गणेश तुकाराम पाचपोहे गोरेगाव यांनी महाड शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात भा द वि 353, 341, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here