@maharashtracity

धुळे: भाजीपाला विक्रेत्याकडून हप्त्याची (extortion) मागणी करत त्याच्यावर जीवघेणा हल्ला करणार्‍या धुळ्यातील तिघा पोलिसांविरुध्द (Dhule Police) आझादनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

अमोल मधुकर जाधव (वय 32, रा.ग.नं.5 धुळे) या भाजीपाला विक्रेत्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, धिरज गवते, सोमनाथ बिर्‍हाडे, मिलिंद लोंढे या तिघा पोलिसांनी अमोल जाधवकडे खंडणी मागितली. तु क्लब चालवतो, तु फार कमवतो आहे, मला हप्ता दे, असे म्हणत पोलीस कर्मचारी मिलिंद लोंढेने अमोल यांच्या गळ्यातील सोन्याची चैन ओढली.

त्याला प्रतिकार केला असता धिरजने हातातील लोखंडी सळईने अमोलवर हल्ला करुन त्याला जखमी केले. तसेच पोलीस कर्मचारी सोमनाथ आणि मिलिंदने हाताबुक्क्यांनी मारहाण केली. आमच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला तर तुला जीवंत मारुन टाकू, तुझ्यावर खोटे गुन्हे दाखल करु, असा दमही तिघांनी अमोलला भरला. या प्रकरणी अमोल जाधवने दिलेल्या फिर्यादीवरुन वरील तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here