@maharashtracity

धुळे: हॉटेलमध्ये दारु पिवून गोंधळ घालणार्‍यास हटकल्याने साथीदारांना बोलावून हॉटेल मालकाला बेदम मारहाण करीत २० हजार रुपये हिसकावून नेल्याचा प्रकार शिरपूर (Shirpur) तालुक्यातील अजनाड शिवारात हॉटेल आकाश येथे घडला.

याबाबत थाळनेर पोलिस ठाण्यात जखमी केवलसिंग बाबुराव राजपुत (वय ६१) रा. मांडळ शिवार शिरपुर याने फिर्याद दिली आहे.

दि. ५ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास शिरपुर-चोपडा रोडवर असलेल्या अजनाड शिवारात हॉटेल आकाश गार्डन येथे राहुल पाटील रा. शिरपुर हा आला. त्याने दारु पिल्यावर जोर जोरात ओरडून वेटर भैया पाटील यास शिवीगाळ केली. हॉटेल मॅनेजर व मालक केवलसिंग राजपुत यांनी सोडवले.

केवलसिंग यांनी त्यास समजावण्याचा प्रयत्न केला. त्याचा राग येवून राहुल पाटील याने थांब बेटा तुला बघतो, अशी धमकी दिली. हॉटेल बाहेर जावून त्याने त्याच्या साथीदारांना बोलावून घेतले. रात्री १० वाजता केवलसिंग राजपुत हे हॉटेलच्या बाहेर घरी जाण्यासाठी निघाले तेव्हा ७ ते ८ इसमांनी हल्ला केला.

यातील योगेश सोनवणे याने फायटरने केवलसिंग यांच्या डोळ्याजवळ मारले तसेच राहुल प्रतापराव सोनवणे यानेही बुक्के मारुन दुखापत केली. खिशातील २० हजार रुपये योगेश पाटील याने बळजबरीने काढून घेतले.

जखमी हॉटेल मालकास शिरपुर कॉटेज रुग्णालयात (Shirpur Cottage Hospital) व तेथून धुळ्यात सिध्देश्‍वर हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. याप्रकरणी योगेश पाटील, राहुल पाटील, सुनिल पाटील, प्रशांत शिंपी, आप्पा पाटील व इतर २ अनोळखी इसम अशा ७ जणांविरुध्द थाळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here