Twitter : @maharashtracity

मुंबई :

मुंबईत बोरीवली पश्चिमेला मंटनपाडा साईबाबा नगर, वीणा संतुर सोसायटी इमारतीला लागलेल्या आगीत होरपळून दोघांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना शताब्दी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीत ग्लोरी वालफाटी (४३ वर्षे) आणि जोसू जेम्स रॉबर्ट (८ वर्षे) यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तीन जण गंभीर झाले आहे. तिघांना जवळील रूग्णालयात उपचासाठी दाखल करण्यात आलं आहे. तसेच अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले असून घटनास्थळी आग शांत करण्याचे काम सुरु आहे. या आगीमुळे रहिवाशी नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र आग नेमकी कशामुळे लागली? याबाबतचे कोणतेही कारण समोर येऊ शकलेले नाही. त्यामुळे स्थानिक पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलाकडून याबाबतचा तपास करण्यात येत आहे. या आगीमध्ये तीन जण जखमी झाले असून त्यातील एकाची परिस्थिती गंभीर असल्याची माहिती समजत आहे.

समितीने सुचवलेला अहवाल आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी स्विकारला :
ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उन्नत नगर येथे जय भवानी एस. आर. ए. को ऑपरेटिव्ह सोसायटीला लागलेल्या आगीची प्राथमिक चौकशी अहवाल आठ सदस्यीय समितीने आयुक्त इकबाल सिंह चहल यांना सादर केला. भविष्यात आगीच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी समितीने १५ उपाययोजना सुचविल्या समितीने सादर केलेला अहवाल पालिका आयुक्तांनी स्विकारला आहे. गोरगावच्या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी समिती स्थापन करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. आयुक्त चहल यांनी प्राथमिक चौकशी करून अहवाल सादर करण्यासाठीचे आदेश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांना दिले होते. डॉ. सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आठ अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली होती. समितीमध्ये महानगरपालिका अधिकारी, पोलीस, झोपडपट्टी पुनर्वसन, अग्निशमन अधिकारी, म्हाडा आदी प्राधिकरण आणि यंत्रणांच्या अधिकाऱ्यांचाही समावेश होता.
भविष्यात अशा प्रकारच्या आगीच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजनाबाबत संबंधित समितीने केलेल्या शिफारशी सुचवल्या आहेत. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here