Twitter : @Rav2Sachin

मुंबई:

नवरात्रीमध्ये गरबा – दांडियामध्ये वेगवेगळ्या रंगांचे कपडे तर बरेच जण घालतात. पण किर्ती एम. डोंगर सी कॉलेजने (Kirti College) दरवर्षीप्रमाणे यंदाही काहीतरी वेगळे करण्याचे ठरवले. “नवकीर्ती” हा उपक्रम खूप वर्षांपासून कीर्ती कॉलेज राबवत आहे. यावर्षीही नवकिर्ती उपक्रमामध्ये काहीतरी वेगळेपण त्यांनी आणले असून ते नवरात्रीच्या नऊ रंगांचे प्रतीक असलेले उपक्रम राबवत आहेत.

केसरी रंग ऊर्जेचे प्रतीक, पांढरा रंग शांततेचे प्रतिक, हिरवा रंग निसर्गाचे प्रतीक असून यावर आधारित उपक्रम नवकिर्तीमध्ये राबवले जात आहे. जसे केसरी रंगाच्या दिवशी नवकिर्तीचे उद्घाटन समारंभ पार पडले. याच दिवशी करिअर मार्गदर्शनवर (career guidance) सत्र झाले. सफेद रंगाच्या दिवशी मेडिटेशन आणि योगा प्रशिक्षण व स्वच्छ भारत रॅली (Swachh Bharat Rally) काढण्यात आली. लाल रंगाच्या दिवशी एड्स (AIDS) आणि एचआयव्हीवर (HIV) सत्र पार पडले. एचआयव्ही आणि एड्सवर कॉलेज परिसरात रॅलीही काढण्यात आली.

पिवळ्या रंगाच्या दिवशी नारीशक्तीवर जानवी कोलते यांचे सत्र झाले व पोस्टर मेकिंग कॉम्पिटिशन (poster making competition) आयोजित करण्यात आले होते. निळ्या रंगाच्या दिवशी हर्षद भोसले सरांकडून व्यक्तिमत्व विकासाचे सत्र घेण्यात आले. सोबत समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. हिरव्या रंगाच्या दिवशी रोहन राजपकर यांनी निसर्गाचे महत्त्व या विषयावर उपस्थितांना संबोधित केले. वृक्ष संवर्धनही करण्यात आले. अशा तऱ्हेने नवरात्रातील नऊ रंगांवर आधारित कीर्ती कॉलेज एनएसएस युनिट हे उपक्रम राबवत आहे.

सुयश सकपाळ, मृण्मयी सुपल व भरत चौधरी ह्या स्वयंसेवकांनी या उपक्रमाचे आयोजन केलेले आहे. याकरिता प्राध्यापक अंकुश दळवी व प्राध्यापिका पूजा कांबळे ह्या प्रोग्राम ऑफिसरचे त्यांना मार्गदर्शन लाभले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here