@maharashtracity

धुळे: दारुसाठी पैसे देत नसल्याने वृध्द महिलेला डोक्यात कुर्‍हाडीने वार करुन जिवे ठार मारण्यात आल्याची धक्कादायक घटना साक्री तालुक्यातील छावडी गावात घडली आहे.

मयत महिलेचा मुलगा मुका असल्याने महिला मरण पावल्यावर आठ दिवसानंतर निजामपुर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला.

याप्रकरणी किसान ओंकार पिंपळे (वय ४५) रा. छावडी ता. साक्री याने दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. ११ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास किसान पिंपळेची आई शंकुतला ओंकार पिंपळे (वय ६५) या घरात असतांना भास्कर निंबा पिंपळे आणि अंकित भास्कर पिंपळे या दोघांनी तिच्याशी वाद घातला.

दारु पिण्यासाठी पैसे देत नसल्याने भास्कर पिंपळे याने शंकुतलाबाईच्या डोक्यात कुर्‍हाड मारून गंभीर दुखापत केली आणि जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच अंकित पिंपळे याने शिवीगाळ करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. जबर जखमी शंकुतलाबाईला मुक बधिर मुलगा किसान पिंपळे याने रुग्णालयात दाखल केले.

धुळे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असतांना दि. १७ ऑगस्ट रोजी तिचा मृत्यू झाला. यानंतर निजामपूर पोलिस ठाण्यात भास्कर पिंपळे आणि अंकित पिंपळे रा.छावडी ता.साक्री या दोघांवर भादवि कलम ३०२ नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here