@maharashtracity

धुळे – धुळे (Dhule) जिल्ह्यात आज तब्बल दिड महिन्यानंतर दमदार पावसाला (Raining) सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात बुधवारी रात्रभर पाऊस झाला असून आज सकाळी ८ वाजेपर्यंत ५१.५ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. यंदाच्या वर्षी पहिली श्रावण झडी लागल्याने शेतकरी राजा सुखावला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या ऑरेज अलर्ट नुसार धुळे जिल्ह्यात काल मंगळवार दुपारनंतर पावसाला सुरुवात झाली आहे, रात्रभर धुळ्यात पावसाची रिपरिप सुरु होती. त्यानंतर पहाटे पावसाने विश्रांती घेतली. पुन्हा आज बुधवारी सकाळी ११ वाजेनंतर पावसाने बरसण्यास सुरुवात केली आहे.

धुळे (Dhule) शहरासह धुळे तालुका, साक्री, शिरपुर, शिंदखेडा तालुक्यातही गेल्या २४ तासात दमदार पाऊस झाला आहे. यात धुळ्यात ५५.८, साक्री १९ मि.मी., शिरपूर तालुक्यात ६२.४ मि.मी., शिंदखेडा तालुक्यात ६१.४ मि.मी. पावसाची नोंद हवामान खात्याने केली आहे.

धुळे जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्याने शेतकरी वर्ग सुखावला असून आज पुन्हा पावसाची झडी लागल्याने धुळे जिल्ह्यातील नदी नाले वाहते होवून जल प्रकल्प भरण्यास सुरुवात सुध्दा झाली आहे.

दरम्यान, पावसामुळे देवपुरात मंगळवारी सायंकाळी घराची भिंत कोसळून चार जण जखमी झाले. दत्त मंदिर परिसरापासून जवळ असलेल्या तापी माई सोसायटीत रामचंद्र पवार राहतात. त्यांच्या जुन्या घराची खोली भाडेतत्त्वावर दिली आहे.

पावसामुळे या घराची भिंत भिजल्यामुळे ती पडली. त्याखाली दबल्यामुळे तीन महिला व एक बालक जखमी झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर लागलीच देवपूर पोलिसांचे पथक दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना हिरे रुग्णालयात (Hirey Hospital) दाखल केले गेले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here