@maharashtracity

धुळे: महापालिकेच्या (DMC) महापौर पदाच्या आरक्षणासंदर्भात (Reservation of Mayor post) सर्वोच्च न्यायालयात (SC) दाखल याचिकेवर आज अंतिम सुनावणी पुर्ण झाली असून उद्या निकाल देण्याची शक्यता आहे.

महापौर पदाचे आरक्षण एस सी (SC) राखीव होणार की ओबीसीकडे (OBC) महापौरपद जाणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

नगरसेवक संजय जाधव यांच्या याचिकेवर निकाल देतांना धुळे मनपा महापौरपदाचे ओबीसी राखीव आरक्षण रद्द करुन एस सी राखीव करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपिठाने दिले होते. उच्च न्यायालयाच्या निकालाला भाजपाचे नरसेवक संजय पाटील, नगरसेवक प्रदीप कर्पे आणि नगरसेविका प्रतिभा चौधरी यांनी सुप्रिम कोर्टात आव्हान याचिका दाखल केल्या आहेत.

महापौरपद ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षण सोडती नुसार कायम रहावे अशी प्रमुख मागणी याचिकाकर्ते संजय पाटील आणि भाजपच्या नगरसेवकांनी केली आहे. त्यावर सुनावणी सुरु असल्याने महापौर पदाचा कार्यकाळ पुर्ण होवून सध्या महापौर पदाचा प्रभार उपमहापौर भगवान गवळी यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

पुन्हा ओबीसी आरक्षण मिळावे यासाठी याचिकाकर्त्यांचा प्रयत्न आहे. आता सुप्रिम कोर्ट काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान आज १८ रोजी सकाळी सुप्रिम कोर्टात अंतिम सुनावणी घेण्यात आली. दोन्ही बाजुच्या वकीलांचा युक्तीवाद सुप्रिम कोर्टाच्या न्यायाधिशांनी एकून घेतला.

प्रमुख याचिकाकर्ते संजयबापु पाटील यांच्या वतीने जेष्ठ विधीज्ञ ब्रजकिशोर मिश्रा यांनी युक्तीवाद केला. युक्तीवाद झाल्यावर सुप्रिम कोर्टाने निकाल राखून ठेवला असून उद्या १९ रोजी अथवा पुढील आठवड्यात सुप्रिम कोर्ट निकाल जाहिर करण्याची शक्यता असल्याची माहिती याचिकाकर्ते नगरसेवक संजय पाटील व नगरसेवक प्रदीप कर्पे यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here