मुंबई

संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या मीरारोड सरस्वती वैद्य निघृण हत्या प्रकरणात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील रासायनिक पृथ्थकरण अहवाल पोलिसांना मिळाला आहे. सरस्वतीचा मृत्यू किटकनाशक प्राशन केल्यामुळे झाल्याचा दावा आरोपी मनोज साने याच्याकडून केला जात आहे. त्यासाठी पृथ्थकरण अहवाल महत्त्वाचा मानला जात होता. मात्र त्याने सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे शिजवल्यामुळे चाचणीत सरस्वतीच्या मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होऊ शकलेलं नाही.

मीरारोड येथील गीता नगरमध्ये लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणाऱ्या ३२ वर्षीय सरस्वती वैद्य हिची ५६ वर्षीय मनोज याने जून महिन्यात अत्यंत निघृणपणे हत्या केली होती. त्याने सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे करून कुकरमध्ये शिजवल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. इमारतीमध्ये दुर्गंधी पसरल्यानंतर ही बाब समोर आली.

पोलिसांनी अटक केल्यानंतर मनोज सानेने दिलेल्या जबाबानुसार, सरस्वती वैद्य हिने किटकनाशक औषध प्राशन केल्याने तिचा मृत्यू झाला. मात्र त्याच्यावर आरोप येऊ नये, स्वत:चा बचाव करण्यासाठी त्याने सरस्वतीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्लान केला. मात्र मनोज दिशाभूल करीत असल्याचा पोलिसांना संशय होता. त्यामुळे सरस्वतीच्या मृतदेहाचे काही नमुने मुंबईतील कलिना येथील रासायनिक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here