मुंबई
आजकाल मराठी संगीतसृष्टी चांगल्या पद्धतीने अग्रेसर होत आहे. सोशल मीडियावर विविध धाटणीची गाणी आपल्याला ऐकायला आणि पाहायला मिळतात. सिनेसृष्टी सोबतच संगीतसृष्टीला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. याच प्रतिसादाला पाहून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. एक नवीन मराठी म्युझिक रेकॉर्ड लेबल ज्याचं नाव आहे ‘बीग हिट मीडिया’. हृतिक अनिल मनी आणि अनुष्का अविनाश सोलवट या दोघांनी मिळून या रेकॉर्ड लेबलची निर्मिती केली आहे. शिवाय या रेकॉर्ड लेबलचं पहिलं वहिलं भव्य दिव्य ‘आला बैलगाडा’ हे गाणं लवकरच प्रदर्शित होणार आहे. सुत्रांच्यानुसार, हे गाणं सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांनी गायलं असून प्रशांत नाकती यांनी या गाण्याला संगीतबद्ध केलं आहे. सोशल मीडियावर या गाण्याची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे.
निर्माता हृतिक अनिल मनी त्याच्या नव्या म्युझिक रेकॉर्ड लेबलविषयी सांगतो, “आमची ही तिसरी पिढी आहे जी सिनेसृष्टीत काम करत आहे. माझे आजोबा सी एल. मनी हे क्रेएटिव्ह आर्टीस्ट होते त्यांनी बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अनेक सिनेमांचे पोस्टर डिझाईन केलेत. आत्तापर्यंत आम्ही ४००० सिनेमांची पब्लिसीटी आणि प्रमोशनची काम केली आहेत. सिनेमा आणि गाण्यांवर माझं नितांत प्रेम आहे. त्यामुळे मी आणि माझी मैत्रीण अनुष्का अविनाश सोलवट हीने ‘बीग हिट मीडिया’ची निर्मीती केली आहे. महाराष्ट्राची संस्कृती तसेच आपल्या मातीतलं मराठमोळं लोकसंगीत जगभर पसरवण्यासाठी आम्ही विविध गाणी या रेकॉर्ड लेबलमार्फत प्रदर्शित करणार आहोत. तुमचं प्रेम आमच्यासोबत असावं हिचं सदिच्छा !!”
निर्माती अनुष्का अविनाश सोलवट ‘बीग हिट मीडिया’विषयी सांगते, “मनोरंजन क्षेत्रात मी नवीन आहे. परंतु म्युझिक क्षेत्रात काम करण्यासाठी मी फारच उत्सुक आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात विविध संस्कृती आहेत. मला खात्री आहे की ‘बिग हिट मीडिया’ रेकॉर्ड लेबल नक्कीच आपलं लोकसंगीत, आपली परंपरा जगभर पोहोचवेल. ‘आला बैलगाडा’ या गाण्याने आम्ही शुभारंभ करत आहोत. तुमच असंच प्रेम आमच्यासोबत राहू देत.”
संगीतकार प्रशांत नाकती ‘बीग हिट मीडिया’च्या नव्या प्रोजेक्टविषयी सांगतो, “नविन रेकॉर्ड लेबल सुरू करण्याआधी निर्माता हृतिक अनिल मनी आणि निर्माती अनुष्का अविनाश सोलवट या दोघांनी खूप रिसर्च केलं. खूप महिने दोघांनी गाण्यांचा विषय काय असेल यावर काम केलं. अनेक गाण्यांचा अभ्यास केला. त्यानंतर त्या दोघांनी मिळून ‘बीग हिट मीडिया’ची निर्मीती केली. आपल्या महाराष्ट्राची संस्कृती गाण्यामार्फत लोकांपर्यंत पोहचावी म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून ‘आला बैलगाडा’ या गाण्यावर काम करायला सुरूवात केली. गाण्याची खासियत सांगायची झाली. तर, या गाण्यासाठी लाईव्ह बैलगाडा शर्यतीचा कार्यक्रमच आयोजित करण्यात आला होता. ‘बीग हिट मीडिया’च्या संपूर्ण टीमने या गाण्यासाठी अत्यंत मेहनत केली आहे. शिवाय लवकरचं हे गाणं तुमच्या भेटीला येईल.”