@maharashtracity

धुळे: जिल्हा कारागृहातून पसार झालेल्या एका बंदीवानाला शहर पोलिसांच्या पथकाने अवघ्या दोन तासात शोधून पुन्हा जेरबंद केले. एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या गुन्ह्यात तो कारागृहात आहे.

अर्जुन रंगनाथ आव्हाड (वय 19) याच्यावर अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. देवपूर पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. यामुळे सध्या तो धुळ्यातील कारागृहात आहे. मंगळवारी त्याने कारागृहातील दवाखाना विभागाच्या स्वच्छतागृहाच्या छतावरुन पळ काढला. त्यानंतर कारागृह प्रशासनाने शहर पोलिसांना ही माहिती दिली.

त्याचा शोध घेत असतानाच अर्जुन हा नकाणे रोडवरील साईबाबा नगर परिसरात आल्याची माहिती पोलिसांना दिली. यानंतर पोलिस निरीक्षक नितीन देशमुख, कर्मचारी योगेश चव्हाण, कमलेश सूर्यवंशी, नीलेश पोतदार, गुणवंत पाटील, किरण भदाणे यांच्या पथकाने साईबाबा नगरात धाव घेतली. यावेळी पोलिसांना पाहून अर्जुनने तेथूनही पळ काढला. मात्र पोलिसांनी त्याचा सिनेस्टाईल पाठलाग करुन त्याला ताब्यात घेतले. यानंतर अर्जुनला शहर पोलिस ठाण्यात आणले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here