Twitter: @maharashtracity
वीर सावरकर यांचे सुपुत्र कै. विश्वासराव सावरकर यांच्या पत्नी सुंदरबाई या ८५ व्या वर्षीदेखील राज ठाकरे यांच्या कृष्णकुंजच्याच रांगेत असलेल्या सावरकर सदन या वास्तूत राहतात. त्यांच्या दोन कन्या असिलता नितिन राजे आणि विदुला विजय गाडगीळ या सासरी साधेपणाने जीवन जगत आहेत.
प्रसारमाध्यमांमध्ये जवळपास ९० टक्के जणांना या दोघी ठाऊकदेखील नसाव्यात. प्रसारमाध्यमांनीदेखील टीआरपी मिळणार नाही म्हणून कदाचित त्यांना दूर ठेवले असावे आणि इतरांनाच वारेमाप प्रसिद्धी देत आहेत, ज्यांची जनमानसातील प्रतिमा तितकी आदराची दिसत नाही.
– नरेंद्र विठ्ठल कांबळे, मुंबई