By मनीषा मांदाडे

@manishamandade

अत्यंत दु:खद घटना घडली. महिना भर आधी असा विचार सुध्दा मनाला शिवला नसेल जेव्हा इतर राज्यात निवडणूक प्रचारात खासदार राजीव सातव यांनी कॉंग्रेस पक्षाची धुरा समर्थपणे सांभाळली. अतिशय हुशार, अभ्यासू आणि शांत स्वभावाचे, माळी समाजाचे भुषण आज आपल्यातून निघून गेला आहेत. ही बातमी कळताच मन हेलावून गेले. डोळ्यात अश्रू तरळले.

लहानपणीच्या सर्व आठवणी डोळ्यांसमोर सिनेमा सारख्या चित्रित होऊ लागल्या.
राजीवची आई रजनी सातव ह्या आमदार असतांना, मंत्री असतांना कॉंग्रेस पक्षाच्या कामानिमित्त नागपूरला येत असे. नागपूर माझं माहेर. माझे आजोबा गडगंज श्रीमंतांपैकी एक कट्टर कॉंग्रेसी. माझे मोठे बाबा कॉंग्रेसचे कार्यकर्ते. एकमेव निवडणूक लढले पण पराभूत झाले होते.

आमचे एकत्र कुटुंब होते. त्यावेळी आम्ही सर्व बहीण-भाऊ ५ ते १० वर्ष वयोगटातले होतो. राजीव देखील आमच्याच वयोगटातले होते. आणि बऱ्याचदा आई बरोबर आमच्या घरी यायचे. रजनी मावशी कामे आटोपून परत येईपर्यंत आम्ही सोबतच खेळत होतो. नंतर मोठे झाल्यावर ही मी कामानिमित्त दिल्लीला गेले की त्यांना भेटायला गेले आहे. कित्येक वेळा तर समाजाच्या कार्यक्रमात एकाच मंचावर भेट होत असे.

अतिशय कर्तुत्ववान व्यक्तिमत्त्व हरपले आहे याची हळहळ मनाला वाटते.

(मनीषा मांदाडे या पत्रकार आणि सातव कुटुंबियाशी परिचित आहेत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here