@the_news_21
भेटी लागे जिवा !! लागलीसे आस !!
जिथं तिथं भास !! करोनाचा !!
मुखी नाम विठ्ठल !! टाळ मृदुंग ध्वनी
बुक्का गंध टिळा !! कपाळी !!
किती करू वाऱ्या !! विठू माय-बाप !!
थकली लेकरं रे !! काय पाप ?
पदरी अपयश !! आम्हीच का घ्यावं !!
तू भरभरून का !! “त्यांना”च द्यावं ?
झाले नित्याचे हे !! डोळे आकाशी !!
भूमी कोरडी ही !! “ते”तुपाशी !!
इथं सत्तेसाठी रे !! आकांत तांडव !!
जणू युद्ध कौरव !! पांडवांशी !!
भीष्म सेनापती !! फौज कौरवांची !!
पांडवांसाठी इथं !! अर्जुन,शिखंडी !!