मुंबईत दिवसभरात ५७१ रुग्णांची नोंद

@maharashtracity

मुंबई: राज्यात शनिवारी ९,४८९ नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६०,८८,८४१  झाली आहे. आज ८,३९५  रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ५८,४५,३१५  करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६ % एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण १,१७,५७५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान, राज्यात शनिवारी १५३  करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. नोंद झालेल्या एकूण १५३ मृत्यूंपैकी ९७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ५६ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. 

एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने राज्यातील एकूण मृत्यूची संख्या २१८ ने वाढली आहे. 

हे २१८ मृत्यू, सांगली-३४, पुणे-३२, रायगड-३२, सातारा-२२, नाशिक-२१, सोलापूर-१७, नागपूर-१५, ठाणे-१३, हिंगोली-७, जालना-४, लातूर-४, यवतमाळ-३, बीड-२, चंद्रपूर-२, गडचिरोली-२, कोल्हापूर-२, अहमदनगर-१, भंडारा-१, बुलढाणा-१, जळगाव-१, नांदेड-१ आणि रत्नागिरी-१ असे आहेत. 

सध्या राज्यातील मृत्यूदर २.०१ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या  ४,२३,२०,८८० प्रयोगशाळा  नमुन्यांपैकी ६०,८८,८४१ (१४.३९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६,३२,९४९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,४२२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

 मुंबईत दिवसभरात ५७१

मुंबईत दिवसभरात ५७१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. आता पर्यंत बाधित रुग्णांची संख्या ७२४१२२ एवढी झाली आहे. तर २१ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आता पर्यंत १५५२० मृत्यूची नोंद करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here