@maharashtracity

मुंबई: मुंबई महापालिकेतर्फे देवनार डंपिंग ग्राउंड येथे कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्याचे काम हाती घेतले आहे. या प्रकल्पासाठी बांधकाम करणे, देखभाल करणे आदी कामांसाठी प्रकल्प सल्लागार नेमण्यात येणार आहे. त्यासाठी पालिकेने टेंडर प्रक्रिया सुरू केली आहे.

मुंबई महापालिका कचऱ्याचा मानवनिर्मित डोंगर म्हणून ओळख असलेल्या देवनार डंपिंग ग्राउंडवर गेल्या अनेक वर्षांपासून साचलेल्या कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्यासाठी मुंबई महापालिका गेल्या २० वर्षांपासून प्रयत्नशील होती. त्यानुसार पालिकेने ६०० मेट्रिक टन कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्याबाबतच्या प्रस्तावाला यापूर्वीच मंजुरी देण्यात आली होती.

आता आणखीन एका प्रकल्पाचे काम हाती घेण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी ‘आरेखन- बांधा – प्रचालन तत्वावर अंमलबजावणी करण्यासाठी या प्रकल्पाच्या बांधकाम, व्यवस्थापन, देखभाल, दुरुस्ती आदी कामांसाठी ‘प्रकल्प सल्लागार’ नेमण्यात येणार आहे.

पालिकेने यापूर्वी पाणीपुरवठा करणाऱ्या तानसा तलावाच्या ठिकाणी पाण्यापासून वीज निर्मिती करण्याचा छोटेखानी प्रयोग यशस्वीपणे राबवला आहे. मध्य वैतरणा तलावाच्या ठिकाणीही पाण्यापासून वीज निर्मिती करण्याचा पालिकेचा मानस आहे. मात्र त्याला अद्याप मुहूर्त लाभलेला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here