@maharashtracity

मुंबई: महालक्ष्मी मंदिर , ब्रीच कॅन्डी रुग्णालय परिसरात मुंबई महापालिकेच्या ताब्यातील जागेत २४० वाहन क्षमता असलेले ‘रोबोटिक तंत्रज्ञान’वर आधारित २१ मजली ( हबटाऊन स्कायबे या इमारतीमध्ये) स्वयंचलित वाहनतळ (Robotic Automatic Car Parking) उभारण्यात आले आहे. अशा आधुनिक पद्धतीचे पालिकेच्या ताब्यातील जागेवर उभारलेले मुंबईतील पहिलेच वाहनतळ आहे.

या वाहनतळाचे लोकार्पण पर्यावरण आणि उपनगर पालक मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या हस्ते आणि वस्त्रोद्योग व शहर पालकमंत्री अस्लम शेख (Aslman Shaikh) यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

या वाहनतळामुळे महालक्ष्मी मंदीरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना व ब्रीच कॅन्डी रुग्णालयात रुग्णांना उपचारासाठी घेऊन येणाऱ्या, रुग्णांना भेटायला येणाऱ्या नागरिकांची वाहने पार्क करण्याची अडचण आता दूर होणार आहे. तसेच, रस्त्यावरील बेकायदा पार्किंग बंद होण्यास हातभार लागणार आहे.

असे केले जाते वाहन पार्किंग

मुंबईतील एका बहुमजली वाहनतळाच्या प्रवेशद्वारावर असणा-या एका भव्य पोलादी ‘प्लेट’ वर एक कार उभी केली जाते. कारची नोंद पार्किंगच्या प्रवेशद्वाराजवळ असणा-या ‘रिसेप्शन काऊंटर’वर संगणकीय पद्धतीने केली जाते. त्यानंतर पोलादी प्लेट स्वयंचलित पद्धतीने कारसह वाहनतळामध्ये प्रवेश करते. वाहनतळामध्ये असणा-या भव्य लिफ्टमध्ये ती कार स्वयंचलित पद्धतीने सरकवली जाते. त्यानंतर ज्या मजल्यावर कार उभी करण्यासाठी जागा उपलब्ध आहे, त्या मजल्यावरील पार्किंगच्या ठिकाणी लिफ्ट स्वयंचलित पद्धतीनेच जाऊन ‘कार’ पार्क केली जाते. याचप्रकारे पार्किंगमधून कार बाहेर काढताना देखील रोबोटिक व स्वयंचलित पद्धतीनेच ‘कार’ बाहेर पडते.

वाहन तळाची वैशिष्ट्य

(१) या वाहनतळाला २ प्रवेशद्वारे असून २ बहिर्गमन द्वारे आहेत. या वाहनतळाची दर तासाला ६० वाहनांचे प्रचालन करण्याइतकी क्षमता आहे.

(२) वाहनतळ आठवड्याचे सातही दिवस व दिवसाचे २४ तास कार्यरत राहणार आहे.

(३) वाहनतळ उभारण्यासाठी वापरण्यात आलेल्या सामुग्रीपैकी ८० टक्के सामुग्री भारतीय असून २० टक्के सामुग्री आयात केलेली आहे.

(४) या वाहनतळामध्ये स्वयंचलित पद्धतीने वाहनांची ने-आण करण्याकरीता २ मोठे उद्वाहक असून या व्यतिरिक्त २ शटल डिव्हाइस व २ सिलोमेट डॉली आहेत. तसेच कार वळविण्यासाठी ४ स्वयंचलित टर्न टेबल देखील या वाहनतळामध्ये आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here