@maharashtracity

मुंबई: राज्यात आज गुरुवारी कोरोनाच्या ९,८४४ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित (corona updates) रुग्णांची एकूण संख्या ६०,०७,४३१ झाली आहे. काल ९,३७१ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर राज्यात आजपर्यंत एकूण ५७,६२,६६१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.९३ % एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण १,२१,७६७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

तसेच राज्यात (Maharashtra) गुरुवारी १९७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. नोंद झालेल्या एकूण १९७ मृत्यूंपैकी १४९ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ४८ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.

एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर गुरुवारी अद्ययावत झाल्याने राज्यातील एकूण मृत्यूची संख्या ३५९ ने वाढली आहे. हे ३५९ मृत्यू, पुणे-६९, नाशिक-५४, औरंगाबाद-४९, लातूर-४७, ठाणे-२९, अहमदनगर-२८, सांगली-१३, अकोला-१०, नागपूर-८, परभणी-७, सातारा-७, धुळे-६, रत्नागिरी-५, सिंधुदुर्ग-५, जळगाव-४, कोल्हापूर-४, उस्मानाबाद-३, यवतमाळ-३, बीड-२, बुलढाणा-२, रायगड-२, जालना-१ आणि सोलापूर-१ असे आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर २ % एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,०३,६०,९३१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६०,०७,४३१ (१४.८८टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

सध्या राज्यात ६,३२,४५३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,१६६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबईत दिवसभरात ७७३

मुंबईत दिवसभरात ७७३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. आता पर्यंत बाधित रुग्णांची संख्या ७२२७३६ एवढी झाली आहे. तर १० कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आता पर्यंत १५३४८ मृत्यूची नोंद करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here