मुंबई: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यातील जनतेच्या आरोग्य सुविधा मिळाव्यात म्हणून अनेक हात पुढे येत आहेत. याचाच एक भाग म्हणून एमएसडी इंडिया कंपनीच्यावतीने २० ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर, दोन लाख लिटर सॅनिटायझर, १०० स्प्रेअर्स, दोन लाख १६ हजार मास्क दिले. सदर कंपनी ही सुप्रसिध्द ‘ मर्क’ या औषध क्षेत्रातील उद्योग समुहातील आहे. कंपनीचे वितरण प्रमुख सचिन साबळे यांनी हे साहित्य उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे सुपूर्द केले. हे साहित्य एमआयडीसीमार्फत राज्यातील विविध भागातील कोविड केंद्रांना वितरित केले जाणार आहे. या मदतीबद्दल श्री. देसाई यांनी कंपनी प्रतिनिधींचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here