@maharashtracity

एमआयएमच्या आमदारांची केली होती बदनामी

धुळे: धुळे महापालिकेच्या (DMC) महासभेत भाजपाचे नगरसेवक हिरामण गवळींनी (BJP corporator Hiraman Gawali) एमआयएमचे आमदार फारुक शाह (MIM MLA Faruk Shah) यांच्यावर गंभीर आरोप केले होते. परिणामी, आ.शाह यांनी नगरसेवक गवळींविरुध्द शहर पोलिसात फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल झाला.

याबाबत आ. फारुक शाह यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, धुळे शहरामध्ये कचरा उचलला जात नाही, कचरा गाडी नियमीत येत नाही. तसेच कचर्‍याच्या गाडीमध्ये माती रेती दगड वैगेरे टाकून कचऱ्याचे वजन वाढविण्यात येते. त्यामध्ये सर्वसामान्य लोकांच्या पैशांची लूट होत आहे. या बाबतची लेखी निवेदने आणि तोंडी तक्रारी वेळोवेळी प्राप्त झालेल्या होत्या.

“त्यावरून मी नगरविकास मंत्र्यांना कचरा प्रश्‍नावर शहरामध्ये होत असलेले दुर्लक्ष आणि त्यामध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराबाबत सविस्तर पत्र दिले. माझ्या पत्राची दखल घेवून उप सचिवांनी धुळे महानगर पालिकेतील कचरा संकलन करण्याचा ठेका रद्द करण्याबाबत सविस्तर अहवाल सादर करणेबाबत सांगितले आहे,” असे आ शाह म्हणाले.

“स्विकृत नगरसेवक हिरामण गवळी यांनी समाजामध्ये तसेच माझ्या स्थानिक मतदारसंघात माझी बदनामी करण्याच्या उद्देशाने मनपाच्या महासभेत बिनबुडाचा खोटा आरोप केला,” अशी फिर्याद आमदार शाह यांनी दिली. या प्रकरणी नगरसेवक गवळींविरुध्द शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here