आता गणेश मंडळांना अनामत शुल्क १०० रुपये

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सर्व गणेशभक्तांना मोदक आणि पेढे

Twitter : @Rav2Sachin

मुंबई:

यंदाच्या गणेशोत्सवात चायनाच्या गणेश मुर्तींवर कायमची बंदी घालण्यासंबंधीची मागणी गणेश मंडळ आणि मुर्तिकारांनी केली असता महापालिका, संबधित विभाग आणि मंडळांशी चर्चा करेल, असे स्पष्टीकरण देण्यात आल्याची माहिती भाजपाचे मुंबई अध्यक्ष आमदार आशीष शेलार यांनी सांगितले.

गणेशोत्सवात येणाऱ्या विविध अडचणी संदर्भात पालक मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी महापालिका मुख्यालयात विशेष बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीत महापालिकेच्या विविध विभागाचे अधिकारी तसेच अग्निशमन दल, पोलीस प्राशासन आणि नौदलाचे अधिकारी ही उपस्थीत होते.

अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघ तसेच मुर्तीकार संघाने गणेशोत्सवात येणाऱ्या विविध अडचणी बैठकीत मांडल्या. यावर सकारात्मक निर्णय घेण्यात आले, असे अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघाचे अध्यक्ष जयंत साळगांवकर यांनी maharashtra.city शी बोलताना सांगितले.

यंदापासून चायनाच्या गणेशमुर्तींवर बंदी घालण्याची मागणी गणेश मंडळांनी आणि मुर्तीकारांनी केली असता महापालिका संबधित विभाग आणि योजनांशी चर्चा करेल, असे स्पष्टीकरण बैठकीत देण्यात आल्याची माहिती भाजपाचे मुंबई अध्यक्ष आमदार आशीष शेलार यांनी सांगितले.

तसेच यंदा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त गिरगाव तसेच अन्य चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी येणाऱ्या गणेश भक्तांचे तोंड मोदक आणि पेढे देऊन गोड केले जाणार आहे, असा ही निर्णय बैठकीत घेण्यात आल्याची माहिती शेलार यांनी दिली.

तसेच यंदापासून गणेश मंडळांची अनामत रक्कम ही १ हजार रुपयांवरून १०० रुपये करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आलेला आहे, अशी माहिती बृहन्मुंबई वाक्रकुंड मुर्तीकार संघाचे कार्याध्यक्ष अविनाश जाधव यांनी सांगितले.

या बैठकीनंतर पत्रकारांना माहिती देताना आमदार अँड. आशिष शेलार यांनी सांगितले की, गणेशोत्सव मंडळांकडून 1 हजार रुपये अनामत रक्कम घेण्याचा निर्णय यावर्षी महापालिकेने केला होता, त्याला आमचा विरोध होता, त्याबाबत चर्चा केल्यानंतर यावर्षी केवळ शंभर रुपये अनामत रक्कम घेण्याचे पालिकेने मान्य केले आहे. ही अत्यंत समाधानकारक बाब आहे.


तसेच सरसकट पीओपीच्या गणेशमूर्तींवर बंदी घालून कारखान्यांवर धाडसत्र, अशी कारवाई महापालिका करणार होती, त्यालाही आमचा विरोध होता. याबाबत चर्चा करण्यात आली.

शेलार पुढे म्हणाले, पर्यावरण पूरक गणेशमूर्ती असाव्यात हा आग्रह चांगला आहे, मात्र एकाएकी निर्णय घेऊन एवढा मोठा बदल करता येणार नाही. त्यासाठी मूर्तीकारांयना काही वेळ द्यावा लागेल. त्याबाबत आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात चायनीज गणेशमुर्त्या येत असून त्यावर सरसकट बंदी आणण्यात यावी अशी मागणी करण्यात आली, त्याबाबत महापालिकेने तयारी दाखवली आहे.

काही गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांवर जुने खटले सुरू आहेत ते मागे घेण्यात यावे, अशी मागणी आम्ही केली. तर गणेशोत्सव साजरा करताना, गणपती आणताना व विसर्जन मिरवणुका लक्षात घेऊन वाहतूक नियोजन करावे, रस्त्यावर खड्डे असू नये, अशी मागणी आम्ही केल्याचे आमदार अँड आशिष शेलार यांनी सांगितले.
आजच्या बैठकीतील सविस्तर मुद्दे

१. गणेश मूर्तिकार / मूर्ती साठवणूकदार यांना परवानगीसाठी असलेली रु.१०००/- असलेली अनामत रक्कम कमी करून ती रु. १००/- करण्यात आली.
२. गणेशोत्सवाच्या विसर्जन काळामध्ये मुंबई महापालिकेच्या वतीने गणेश भक्तांचे तोंड गोड करण्याची व्यवस्था महापालिकेमार्फत करण्यात येईल.
३. विसर्जनाचे सर्व मार्ग व त्यावरील सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्यात येतील.
४. चिनी बनवटीच्या मूर्तींवर आळा तसेच प्रतिबंध घालण्यासाठी पाउले उचलली जातील.
५. प्रत्येक गणेश मंडळाकडे सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी दिवसातून ३ वेळा महापालिकेच्या वतीने साफसफाई केली जाईल.
६. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी आरोग्य शिबिरे भरविण्यात येतील.
७. गणेशोत्सवाच्या १५ दिवस आधी विसर्जन मार्गाचा आढाव घेऊन योग्य ती खबरदारी घेतली जाईल.
८. गत वर्षी विसर्जन मिरवणुकितील विसर्जनास नेण्यात येणाऱ्या वाहनांवर / गणेश मिरवणुकितील गणेश भक्तांवर पोलीस खटले दाखल केलेले आहेत. ते काढण्याबाबत योग्य ती कार्यवाही केली जाईल.
९. शहरात गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची संख्या वाढवली जाईल.
१०. पीओपी मूर्ती विसर्जन झाल्यानंतर त्यांचे योग्य पद्धतीने विघटन केले जाईल.
११. गणेश विसर्जनावेळी काही अडथळे आल्यास त्याकडे प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी असे आदेश पालकमंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here