Twitter: @vivekbhavsar

मुंबई: मुंबईपासून अवघ्या ६० किलोमिटर अंतरावर असलेली, मध्य रेल्वे मार्गावर वसलेली आणि मुंबईसह प्रस्तावित नवी मुंबई विमानतळ अगदी हाकेच्या अंतरावर असे सगळेच प्लस पॉइंट  असलेली अंबरनाथ येथील नवीन एम आय डी सी झपाट्याने विकसित होत आहे. जुनी एमआयडीसी कधीच विकसित झाली असून नव्याने प्लॉट पाडून उद्योजकांना दिली जात आहे. स्थानिक भूमीपुत्रांसाठी या भागाच्या विकासाचे दार उघडले असेल तरी काही एजंट याचा गैरफायदा उचलत असून त्यांच्यासाठी उद्योजकांना लुटण्यासाठी  जणू ” फाटक ” उघडले आहे. या विरोधात स्थानिक प्रकल्पग्रस्त अशा एजंट यांच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याची तयारी करत आहेत.

जुनी अंबरनाथ एमआयडीसी रासायनिक, औषध कंपन्यासाठी उपयुक्त सिद्ध झाली आहे. मुंबईजवळ असलेली नगरी, पाण्याची उपलब्धता आणि दळणवळणाची साधने ही देखील अंबरनाथ उद्योग नगरी म्हणून विकसित होण्यास कारणीभूत ठरली. याच भागात माहिती व तंत्रज्ञान हब विकसित करण्याचा शासनाचा निर्णय या भागाच्या विकासाला पूरक ठरला. अतिरिक्त एमआयडीसी, आनंदनगर एमआयडीसी नंतर आता नव्याने एमआयडीसी विकसित करण्याचे काम उद्योग विभागाने हाती घेतले आहे.

नेमकी हीच संधी साधून काही एजंट यांनी अंधेरी एमआयडीसी मुख्यालय आणि उद्योग मंत्री यांच्या कार्यालयाला हाताशी धरून गेल्या सात – आठ वर्षात नव्याने येणाऱ्या उद्योजकांना लुटीचे फाटक उघडून स्वतःच्या तिजोरी भरण्याचे काम केले आहे.

औद्योगिक प्लॉट देताना या एजंट ला अंडर द टेबल मिठाई द्यावी लागते, त्याशिवाय नव उद्योजकाला प्लॉट दिला जात नाही, अशा तक्रारी काही उद्योजकानी केल्या आहेत. 

एमआयडीसी मध्ये एलएसी (Land Allotment Committee) अर्थात भूखंड वाटप समिती कार्यरत आहे. मात्र, जो पर्यंत हे एजंट हिरवा कंदील दाखवात नाहीत तोपर्यंत उद्योजकाला भूखंड वाटप करण्याचा निर्णय घेतला जात नाही. 

अर्थात असे एकमेव फाटक नाही, असंख्य दारे आणि खिडक्या कार्यरत आहेत. या एजेंटला मुंबईतून कोणाचा आशीर्वाद आहे? भूखंडाची मूळ रक्कम किती असते आणि ती किती पटीने वाढते? गेल्या सात वर्षांत आदिवासी जमिनी एमआयडीसी ने संपादित करताना आदिवासींची कशी फसवणूक केली? खोल वाहणाऱ्या नाल्यातील प्लॉटवर उद्योग उभा राहू शकणार नाही हे माहीत असूनही कुठल्या उद्योजकाला खड्ड्यातील प्लॉट देऊन फसवणूक केली गेली? चिखलोलीमधील स्थानिक प्रकल्प ग्रस्तांची फसवणूक कशी केली गेली? Piramal चा प्लॉट घेताना सरकारची कशी फसवणूक झाली? या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दीर्घ मालिकेतून वाचा..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here