Twitter : @maharashtracity
मुंबई
इंडिक टेल्स व हिंदू पोस्ट या वेबसाईटवर महिला शिक्षणाच्या आद्य जनक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी खालच्या पातळीवर लिखाण केले. या निंद्य कृतीचा धिक्कार करून सदस्य अमोल मिटकरी, विक्रम काळे, सतीश चव्हाण, आदींनी कारवाईची मागणी केली. हि वेवसाईट त्वरित बंद करून लिखाण केलेल्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी लक्षवेधी सूचनेतून करण्यात आली.
दरम्यान, यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संगीतले की, महनीय विभुतींबाबत आक्षेपार्ह लिखाण समाज माध्यमांवर केल्यास त्यांच्यावर काय कारवाई करता येईल याबबात धोरण ठरविण्यात येईल. हे धोरण ठरविण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात येणार असल्याचे फडणवीस यांनी सभागृहाला सांगितले. शिवाय या प्रकरणातील दोषींवर कडक शिक्षा होईल, असे पाहण्यात येईल, असे आश्वासन फडणवीस यांनी दिली.
दरम्यान, फडणवीस यांनी सांगितले कि, महिला शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या जनक सावित्री बाई फुले यांच्यावर भारद्वाज स्पिक नावाच्या ट्विटवरून त्यांचा अपमान केला. याचा सरकारने निषेध केला असून हा अवमान सहन केला नाही. तसेच पोलीस आयुक्तांना सूचना करून कारवाईचे निर्देश दिले. मात्र कारवाईत काही अडचणी आहेत, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार यांच्यावर दोन्ही कलम लावली. ४१ ची नोटीस बजावण्यात आली आहे. भारद्वाज ट्विट चा उद्गाता कोण आहे हे जाणून घेण्यासाठी ट्विटरला तीन वेळा पत्र लिहिले आहे. अखेर निर्वाणीचे पत्र लिहून माहिती देण्याचे सांगून आरोपीवरची नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच असे प्रकार घडू नयेत, यासाठी कठोरात कठोर कारवाई कशी करता येईल, असे करणार असल्याचे फडणवीस म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाने कारवाईसाठी दिलेल्या निर्देशानुसार पाहिले तर आय टी ऍक्ट नुसार शिक्षा आहे. मात्र आयपीसीचे ऑफेन्स लावू नये असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असल्याने अनेक लोक देशातील प्रमुख लोकांबद्दल वाटेल ते लिहून नंतर डिलीट करतात. त्यांना कोठडीत टाकल्यास न्यायालय सरकार विरोधात भाष्य करते, म्हणून या मुद्द्यावर धोरण ठरविण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात येईल. यातून जास्तीत जास्त कशी कडक शिक्षा होईल, असे पाहिले जाईल, असे फडणवीस यांनी आश्वासन दिले.