Twitter : @maharashtracity

मुंबई

पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशीच राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) सदस्य रोहित पवार यांनी सकाळी 10 वाजेपासून कर्जत जमखेड या त्यांच्या मतदारसंघातील एमआयडीसीसाठी उपोषण सुरू केल्याचा मुद्दा त्यांच्या पक्षाचे ज्येष्ठ सदस्य अनिल देशमुख यांनी विधानसभेत उपस्थित केला.

कर्जत- जामखेड मतदार संघातील एमआयडीसीला मंजुरी देण्यात यावी यासाठी रोहित पवार यांनी भर पावसात आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या पायऱ्यांवर उपोषण सुरू केले आहे, याकडे देशमुख यांनी लक्ष वेधले. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अधिवेशन संपण्यापूर्वी एमआयडीसीला मान्यता देण्यात येईल,असे आश्वासन दिले होते. त्यांनतर हे तिसरे अधिवेशन आले आहे, मात्र मान्यता मिळाली नाही, याची माहिती देशमुख यांनी सभागृहाला दिली. शासनाने याची गंभीरपणे दखल घ्यावी, अशी विनंतीही देशमुख यांनी केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी उत्तर दिले. उद्योग मंत्र्यांनी 1 जुलै रोजी लिहिलेले पत्रही त्यांनी सभागृहात वाचून दाखवले. या अधिवेशनात त्याबाबत बैठक होऊन निर्णय होईल. त्यामुळे सदस्यांना पावसात उपोषणाला बसण्याची गरज नव्हती, असेही पवार म्हणाले.

अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीदेखील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पावित्र्य राखावे, ती उपोषणाला बसण्याची जागा नव्हे, असे स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here