@maharashtracity

नवनियुक्त पोलीस अधीक्षक प्रवीण पाटील यांची ग्वाही

धुळे: धुळे शहराला गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी जनतेचा प्रतिसाद आवश्यक आहे. जनतेने पोलिसांना योग्य प्रतिसाद दिल्यास धुळे जिल्हा गुन्हेगारीमुक्त (crime free Dhule) आणि गुंडगिरीमुक्त होण्यास वेळ लागणार नाही. तसेच महापालिकेच्या सहकार्याने शहरातील वाहतूक व्यवस्थाही सुधारण्यासाठी प्रयत्न केले जातील. जनतेसाठी पोलीस आहे, हा विश्‍वासही निर्माण करण्याचा माझा प्रयत्न असेल, अशी ग्वाही नवनियुक्त पोलीस अधीक्षक प्रवीण पाटील यांनी दिले. (Pravin Patil took charge as new SP in Dhule)

तत्कालिन पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत यांची नागपूर येथे विनंती बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी जिल्हा पोलिस प्रमुख म्हणून प्रविण पाटील यांची नियुक्ती झाली. अधीक्षक पाटील यांनी मंगळवारी सकाळी अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्याकडून जिल्ह्याचा पदभार स्विकारला.

यावेळी अप्पर अधीक्षक बच्छाव यांनी अधीक्षक पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी गृह विभागाचे ईशवर उपअधीक्षक कातकाडे, पोलीस उपअधीक्षक विजय जाधव, पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत उपस्थित होेते.

यावेळी माध्यमांशी बोलतांना अधीक्षक पाटील म्हणाले की, धुळे जिल्हा आणि शहर माझ्यासाठी नवीन नाही. मला हा जिल्हा व शहर चांगल्या प्रकारे अवगत आहे. येथे गुन्हेगारी वाढली आहे. सततच्या घरफोड्या, गुंडगिरी आणि अवैध व्यवसाय यांचा मला अभ्यास आहे. प्राणांतिक अपघातांचे प्रमाण देखील येथे अधिक आहे.

वर्षभरात अडीचशेहून अधिक लोकांना अपघातांमध्ये जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे जनतेच्या साथीने गुन्हेगारी, गुंडगिरी आणि अवैध व्यवसाय मोडीस काढण्यासह अपघात कमी करण्यासाठी प्रयत्न करावेच लागतील. पोलिसांचे काम कायदा सुव्यवस्था राखण्याचे असले तरी जनतेच्या प्रतिसादाशिवाय ते शक्य नाही. त्यामुळे जनतेने साथ दिली तर गुन्हेगारी कमी व्हायला मदत होईल, असे पाटील म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here