ऑल फूड अँड ड्रग्ज लायसंस होल्डर फाऊंडेशन असोसिएशनचा मुंबई महानगरपालिका प्रशासनावर आरोप

Twitter : @maharashtracity

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये देण्यात येणारी इंजेक्शन आणि लसीबाबतची निविदा प्रक्रिया पूर्णत्वास न नेल्याने पालिकेला १५ कोटीचे नुकसान झाले असल्याचा आरोप ऑल फूड अॅण्ड ड्रग्ज लायसंस होल्डर फाऊंडेशन असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अभय पांडे यांनी दिली. २०१९ या वर्षात इंजेक्शन आणि लसींचे निविदा प्रक्रिया संपुष्टात आल्यावर गेल्या तीन वर्षापासून स्थानिक खरेदीतून रुग्णांना इंजेक्शन आणि लसी खरेदी कराव्या लागत आहेत. यातून रुग्णाच्या खिशाला चाट तर पालिका प्रशासनाला उगीचच भूर्दंड भरावा लागत आहे.

यावर बोलताना अभय पांडे यांनी सांगितले की, निविदा जाहीर करत नसून त्यामुळे निविदा प्रक्रिया पूर्णत्वास जात नाही. टेंडर फायनल करण्यास न टाकल्याने नुकसान होत आहे. एखादे निविदा प्रक्रिया पूर्ण झाली याचा अर्थ त्या टेंडरची किंमत ठरुन ते रुग्णालयाला पाठविण्यात येते. त्या दरात ते खरेदी करु शकतो असे निविदा प्रक्रियेत भाग घेणारे सांगत आहेत. मात्र काही तांत्रिक बाबी अडथळा ठरत आहेत. तसेच दर न ठरल्यास निविदा प्रक्रिया पूर्णत्वास जात नाही. तसे अडथळे जाणून बुजून आणले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. हे टेंडर इंजेक्शन आणि लसींचे असून अत्यंत महत्वाचे असे आहे. इंजेक्शन आणि लसीचे टेंडर २०१९ मध्ये संपूष्टात आले. नवे टेंडर जानेवारी २०२१ मध्ये काढण्यात आले. मधल्या दोन वर्षाच्या काळात निविदा प्रक्रियाच झाली नव्हती. त्यामुळे स्थानिक खरेदीतून रुग्णांना औषधे दिली जात होती. जानेवारी २०२१ मध्ये काढण्यात आलेले टेंडर जानेवारी २०२२ मध्ये फायनल करण्यात आले. यातही ५० टक्के औषधे देण्यात आली. या इंजेक्शन आणि लसींच्या टेंडरमध्ये विविध प्रकारचे प्रोडक्ट होते. मात्र, त्यातही अर्धेच प्रोडक्ट फायनल केले. तर ५० टक्के अद्यापही फायनल झाले नाहीत. त्याचे टेंडर २०२२ च्या मे महिन्यात काढले. अद्यापही हे टेंडर पुर्णत्वास गेले नसल्याचे पांडे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here