@maharashtracity

धुळे: शेतकर्‍यांना (farmers) केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ देऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न होत आहे. जोपर्यंत अन्नदाता सक्षम होत नाही तोपर्यंत देश सक्षम होऊ शकत नाही. जलयुक्त शिवार योजनेमुळे (JalYukt Shivar Scheme) या भागातील विहिरींना ३० ते ५० फुटांवर पाणी लागले आहे. शासनाच्या सर्व योजनांचा लाभ शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न होतील, असे आश्वासन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुषार रंधे (ZP President Tushar Randhe) यांनी दिले.

जिल्हा परिषद कृषी विभागाच्या (Agriculture Department) माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना राबवण्यात येते आहे. या योजनेंतर्गत शेतकर्‍यांना विंधन विहिरीसाठी मदत केली जाते. या योजनेतून मंजूर विहिरीचे भूमिपूजन तसेच पूर्ण झालेल्या विहिरी, डिझेल इंजिन इलेक्ट्रिसिटी कनेक्शन, ठिबक सिंचन इलेक्ट्रिक मोटार, आडवी बोअर आदी कामांची पाहणी जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रंधे यांनी केली. त्या वेळी ते बोलत होते.

शिंदखेडा तालुक्यातील रेवाडी व धावडे गावामध्ये विहिरीचे बांधकाम, विहिरीतील पाण्याचे नियोजन शेतीसाठी योग्य पद्धतीने होते की नाही याचा जिल्हा परिषद अध्यक्ष रंधे यांनी आढावा घेतला. त्याचबरोबर शेतकर्‍यांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here