@maharashtracity

जाऊ द्या मागे झाले (भाजपबाबत) ते गेले, त्यात लक्ष न देता चलो ऍप घेऊन आपण पुढे चाललो आहोत. आता पुढे चला हा आपला मंत्र आहे पुढेच चालत राहू. आमचा मंत्र पुन्हा चला नाही, तर पुढे चला आहे, असा टोला राज्याचे पर्यावरण मंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी भाजपाला (BJP) लगावला आहे.

बेस्टच्या “टॅप इन टॅप आऊट” कार्डचे (Top in Top Out Card) पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते बुधवारी गेट वे ऑफ इंडिया (Gate Way of India) येथे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी पत्रकारांनी भाजप व मनसे (MNS) यांची हिंदुत्ववादी भूमिका व शिवसेनेला (Shiv Sena) दाबण्याचा प्रयत्न याबाबत विचारणा केली असता त्यांनी वरीलप्रमाणे उत्तर दिले.

तसेच, मनसेने आपली अगोदरची भूमिका बदलून आता हिंदुत्वाची (Hindutva) जी भूमिका घेतली त्याबाबत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, तुम्ही जास्त विचार करताय. आम्ही चांगली काम करतोय. सरकारचे कामही चांगलं आहे. महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) आणि मुख्यमंत्र्यांवर (CM Udhav Thackeray) लोकांचा विश्वास आहे, असे सांगत मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुद्द्याला बगल दिली.

जगभरातील सर्वात स्वस्त आणि मस्त आपली बेस्ट

बेस्ट (BEST) उपक्रमाला पुढे कसं नेता येईल यावर कायम बोलणं होतं असतं. बॉम्ब स्फोट, पूर, कोविड या काळात बेस्ट कायम धावत राहिलीय. बेस्ट खरोखर बेस्ट आहे. जगभरातील सर्वात स्वस्त आणि मस्त आपली बेस्ट आहे, असे मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

बेस्टचा प्रवास इलेक्ट्रिककडून पुन्हा इलेक्ट्रिककडे

बेस्टचं हे अमृत महोत्सव वर्ष आहे. बेस्टचा प्रवास इलेक्ट्रिकने सुरू झाला होता आणि आता पुन्हा आपण इलेक्ट्रिककडेच आलो आहोत, असे मंत्री आदित्य ठाकरे यांनी नमूद केले.

बेस्ट उपक्रमात डबलडेकर बस गाड्या हव्यात हा माझा आणि मुख्यमंत्री यांचा सुरुवातीपासून आग्रह राहिला आहे. ९०० इलेक्ट्रीक एसी डबल डेकर बसगाड्या (Double decker e-buses) येत्या ऑगस्टपर्यंत रस्त्यावर धावताना दिसतील. सध्या बेस्टच्या बस ताफ्यात ३,३३७ बसगाड्या आहेत. बेस्टला एकूण १० हजार बसगाड्यांची आवश्यकता आहे. या बस १०० टक्के पर्यावरण पूरक (eco friendly) असाव्यात. त्यातल्या सर्वच बसगाड्या या इलेक्ट्रिक हव्यात. यातील निम्म्या डबलडेकर बस असतील, असे त्यांनी सांगितले.

पुढील आठवड्यात नॅशनल मोबिलिटी कार्डचं (National Mobity Card) आपण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण करतोय, हे कार्ड सर्वच ठिकाणी चालेल, अशी माहितीही त्यांनी यावेळी पत्रकारांना दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here