इंडियन मेडिकल असोसएशनची मागणी

@maharashtracity

मुंबई: आरोग्य सेवेतील कर्मचारी तसेच पालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर करण्यात आला. त्याच धर्तीवर कनिष्ठ तसेच वरिष्ठ निवासी डॉक्टरांनाही बोनस देण्यात यावा अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनकडून (Indian Medical Association) मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. या मागणीला महाराष्ट्र असोसिएशन ऑफ बॉन्डेड रेसिडंट डॉक्टर्सकडून दुजोरा देण्यात आला आहे.

दरम्यान कोरोना काळात (corona pandemic) रुग्ण सेवा दिल्याने कनिष्ठ तसेच वरिष्ठ निवासी डॉक्टरांना दिवाळी बोनस (Diwali bonus to doctors) द्यावा, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनकडून (IMA) करण्यात आली आहे. तसे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना देण्यात आले आहे.

यावर बोलताना महाराष्ट्र असोसिएशन ऑफ बॉन्डेड रेसिडंट संघटनेचे (Maharashtra Association of Bonded Resident Doctors) उपाध्यक्ष डॉ. अक्षय यादव यांनी सांगितले की, पालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस देण्यात येणार आहे. हा बोनस एका पगार इतका असेल. यामुळे कर्मचाऱ्यामध्ये रुग्णसेवेप्रती उत्साह वाढेल. मात्र, हा बोनस निवासी डॉक्टरांना नसणार. यामुळे ज्या निवासी डॉक्टरांनी (Resident Doctors) कोरोना काळात कुटुंबियांची तसेच स्वतःची तमा न बाळगता मुंबईला वाचवले त्यांना बोनस नाही. यामुळे निवासी डॉक्टर नाराज झाले आहेत. त्यामुळे, निवासी डॉक्टरांनी कोरोना काळात बजावलेल्या रुग्णसेवेचा विचार करता डॉक्टरांना बोनस मिळावा, अशी मागणी यादव यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here