@maharashtracity

मुंबई: राज्यात रविवारी ४४० नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची (Corona patients) एकूण संख्या ८१,२७,६९९ झाली आहे. काल ४३७ रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर राज्यात आजपर्यंत एकूण ७९,७६,५०७ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (recovery rate) ९८.१४ टक्के एवढे झाले आहे.

राज्यात आज रोजी एकूण २८२० सक्रिय रुग्ण असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, राज्यात रविवारी एका कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८२ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,५०,७१,९८१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ८१,२७,६९९ (०९.५५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

मुंबईत १६७ बाधित

मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्रात १६७ एवढे कोरोना रूग्ण आढळले. आतापर्यंत मुंबईत (Mumbai) एकूण ११,५१,५५८ रुग्ण आढळले. तसेच शून्य रुग्णांचा मृत्यू झाल्याने मुंबईतील एकूण मृत्यूची संख्या १९,७३८ एवढी झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here