@maharashtracity

मुंबई: मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य समन्वयक रमेश केरे-पाटील यांनी रविवारी मुंबईत आत्महत्येचा प्रयत्न केला असून त्यांना उपचारसाठी जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती जे जे रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली. (Convenor of Maratha Kranti Morcha attempt to commit suicide)

दरम्यान, केरे यांच्या विष प्राशनाच्या तक्रारीमुळे त्यांना त्वरीत दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर तातडीचे उपचार सुरु असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

रमेश केरे- पाटील (Ramesh Kere – Patil) यांनी फेसबुकवर लाईव्ह प्रक्षेपण करुन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. या प्रक्षेपणात केरे- पाटील म्हणाले आहेत की, माझ्या समाजाचे नुकसान होईल असे कोणतेही पाऊल मी उचलले नाही. समाजासाठी माझे कार्य सुरु होते. त्यातून मराठा समाजाला न्याय मिळेल असा उद्देश ठेवला होता. मात्र, माझी बदनामी होत असून ते मला सहन होत नाहीये. समाजाच्या कार्यात मी गेल्या २० वर्षांपासून कार्यरत असून माझी नाहक बदनामी केली जात आहे. अशा बदनामी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल व्हावेत. शिवाय राज्यातील सर्व समन्वयकांची चौकशी व्हावी अशी मागणी केरे-पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडे केली आहे.

दरम्यान मराठा क्रांती मोर्चा फुटावा यासाठी केरे-पाटील यांनी पैसे घेतले असल्याचा आरोप एका ऑडिओमधून करण्यात आला होता. मात्र, या ऑडिओ क्लीपशी माझा सबंध जोडू नये. या क्लीपमुळे बदनामीतून मला मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे आपण विषप्राशन केले असल्याचे फेसबुक प्रक्षेपणातून (Facebook live) सांगण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर मुंबईतील जेजे रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here