कोरोना रुग्णसंख्या घटल्याचा परिणाम

@maharashtracity

मुंबई: मुंबईत गुरुवारी दिवसभरात ३४१ कोरोनाबाधित आढळून आले. तर ऍक्टिव्ह रुग्ण ५२०१ एवढे होते. यातून मुंबईतील रूग्ण संख्या घटत असल्याचे समोर येत आहे. यातून रुग्णालयातील १५ टक्के खाटा रुग्णांनी व्यापलेल्या आढळून आल्या असल्याचे समोर येत आहे. एनआयसीयू, आयसीयू, ऑक्सिजन अशा एकूण खाटांवरील रूग्ण संख्या देखील घटत असल्याचे दिलासादायी वृत्त आहे.

दरम्यान कोविड हॉस्पिटल, कोविड हेल्थ सेंटरमधील एकूण १७६७२ खाटांपैकी २७५५ खाटा सध्या रुग्णांनी व्यापल्या आहेत. ८८३४ ऑक्सिजन खाटांपैकी (Oxygen beds) ११३२ खाटा रुग्णांनी व्यापले आहेत. तर आयसीयूतील २२७८ खाटांपैकी ८७१ व्हेंटिलेटर बेड भरलेले आहेत. ७७०२ ऑक्सिजन बेड, १४०७ आयसीयू बेड आणि ७२० व्हेंटिलेटर बेड रिकामे आहेत.

तसेच लहान मुलांसाठीच्या आयसीयूतील १५ पैकी केवळ १ बेड वर बाल रूग्ण उपचार घेत असल्याचे सांगण्यात आले. तर ३३ नवजात बालकांच्या आईसीयू बेड्सपैकी (ICU beds) सात बेडवर नवजात बालके उपचार घेत आहेत.

दरम्यान कोविड-पॉझिटिव्ह कर्करुग्णांना (cancer patient) डायलिसिसची गरज असल्याने त्यांच्यासाठी राखीव असलेल्या १२१ बेडपैकी ६२ बेडवर रुग्ण उपचार घेत आहेत. उर्वरित ५९ बेड रिकामे असल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here