तुळशी तलावांत ७३६ मिमी, विहार तलावांत ६३२ मिमी पाऊस

सात तलावांत ४८ दिवसांचा पाणीसाठा

@maharashtracity

मुंबई: सध्या मुंबईत जोरदार पाऊस पडत आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांतही चांगला पाऊस पडला आहे. त्यामुळे तलावातील पाणी साठ्यात काहीशी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे सात तलावांपैकी मुंबई उपनगरातील तुळशी तलावात सर्वाधिक ७३६ मिमी आणि विहार तलावांत ६३२ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, १२ जून रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत अप्पर वैतरणा तलावांत २८.०० मिमी इतका तर आतापर्यंत १६६.०० मिमी इतका, मोडकसागर तलावात ५०.०० मिमी इतका तर आतापर्यंत २६१.०० मिमी इतका, तानसा तलावांत ७७.०० मिमी इतका तर आतापर्यंत २२४.०० मिमी इतका, मध्य वैतरणा तलावांत ६१.०० मिमी तर आतापर्यंत १५१.०० मिमी इतका, भातसा तलावांत – ३२.०० मिमी तर आतापर्यंत १२४.०० मिमी इतका, विहार तलावात १२५.०० मिमी तर आतापर्यंत ६३२.०० मिमी इतका आणि तुळशी तलावात २०७.०० मिमी तर आतापर्यंत ७३६.०० मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे सात तलावातील पाणी साठ्यात काही प्रमाणात वाढ झाली आहे.

तलावांत ४८ दिवसांचा पाणीसाठा

सध्या सात तलावात मिळून एकूण १ लाख ८५ हजार ९७१ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा आहे. मुंबईला दररोज ३ हजार ८५० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा केला जातो. त्यानुसार सध्याचा पाणीसाठा हा मुंबईला पुढील ४८ दिवस म्हणजे २९ जुलैपर्यंत पुरेल इतका आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here