कोरोना प्रतिबंधक लस उत्पादनासाठी एचएएल ला मनपा देणार पंचवीस कोटी

0
328

@maharashtracity

पिंपरी, पुणे: पिंपरी-चिंचवडमधील हिंदूस्थान अँटिबायोटिक्स कंपनीमध्ये (HAL) कोरोना (corona) प्रतिबंधक लस निर्मितीसाठी पंचवीस कोटी रुपयांची आर्थिक मदत करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव पिंपरी चिंचवड (Pimpri – Chinchwad) महापालिका स्थायी समिती सभेमध्ये गुरूवारी सर्वक्षीय सदस्यांनी एकमताने मंजूर केला.

यामुळे हिंदुस्थान अँटिबायोटिक्स कंपनीला मिळणार ऊर्जितावस्था मिळेल तसेच लस निर्मितीच्या बाबतीत पिंपरी-चिंचवडकरांची आता ‘आत्मनिर्भर’ होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे (Nitin Landge) यांनी दिली.

हिंदुस्थान अँटिबायोटिक्स कंपनी व्यवस्थापनाने केंद्र सरकारकडे कोरोना प्रतिबंधक लस निर्मितीबाबत परवानगी मिळावी, असा प्रस्ताव पाठवला आहे. त्यासाठी लागणारी यंत्रणा उभी करण्यासाठी आवश्यक निधी पिंपरी-चिंचवड महापालिकेने द्यावा अशी मागणी करण्यात आली होती. यावर महापालिका स्थायी समिती आणि सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी- पदाधिकाऱ्यांनी तात्काळ निर्णय घेतला आहे.

याबाबत सभापती ॲड. नितीन लांडगे म्हणाले की, ‘एचएएल’कंपनीमध्ये कोरोना प्रतिबंधक लस तयार झाली, तर तुटवडा कमी होण्यास मदत होणार आहे. याबाबतची कंपनी व्यवस्थापनासोबत पहिली प्राथमिक बैठक 17 मे रोजी झाली.
अवघ्या आठवडाभरात हा विषय मार्गी लावला आहे. ‘कंपनीच्या वतीने उत्पादन होणारे पहिल्या टप्प्यातील लस पिंपरी चिंचवड मनपास योग्य किंमतीत प्राधान्याने द्यावेत, अशीही मागणी आपण करणार आहोत.

सर्व परवानग्या आणि केंद्राचा निधी वेळेत मिळाल्यास जुलैच्या शेवटी किंवा ऑगस्ट महिण्यापर्यंत एच. ए एल. मध्ये कोरोना प्रतिबंधक लस उत्पादन सुरु होईल, अशी माहिती कंपनी व्यवस्थापनाच्या वतीने देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here