@maharashtracity

मुंबई: मुंबई शहर जरी कोरोनाबाबत राज्य सरकारने घालून दिलेल्या ब्रेक द चैनअंतर्गत तिसऱ्या स्तरावरून दुसऱ्या स्तरावर आलेले असले तरी सर्वसामान्य जनतेला अद्यापही रेल्वे प्रवास करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळेच सामान्य नागरिकांना केवळ बेस्ट बसचाच आधार राहिला आहे.

दादर, प्लाझा सिनेमा समोरील कोतवाल उद्यान बस स्टॉपवर बोरीवली येथे जाण्यासाठी नागरिकांनी भली मोठी रांग लावल्याचे दिसून आले. मात्र ती रांग बघून बघणाऱ्याला आश्चर्य वाटले व प्रश्नही पडला की, ही रांग बेस्ट बससाठी आहे की, ही ‘ बेस्ट रांग’ आहे ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here