आ.कुणाल पाटील यांच्या वीज अधिकाऱ्यांना सूचना

@maharashtracity

धुळे: धुळे तालुक्यातील शेतीपंप आणि शेतकर्‍यांचे विजेचे प्रश्‍न तातडीने सोडवून विजपुरवठ्याची मंजूर कामे विनाविलंब सुुरु करण्याच्या सूचना आ. कुणाल पाटील यांनी दिल्या.

धुळे तालुक्यातील शेतकर्‍यांना विजेचे प्रश्‍न भेडसावू नये अशा कडक सूचना आ. पाटील यांनी दिल्या. दरम्यान, कृषी पंप आणि गावठाण विजपुरवठ्याच्या कामांसाठी पाहिजे तेवढा निधी आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही आ. पाटील यांनी सांगितले.

आ. कुणाल पाटील यांच्या उपस्थितीत आज दि. १२ जुलै रोजी विज वितरण कंपनीचे अधिकारी आणि जिल्हा नियोजन समितीची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती.

धुळे तालुक्याील शेतकर्‍यांचे आणि ग्रामस्थांचे विजेचे प्रश्‍न सुटावेत म्हणून आ. कुणाल पाटील यांनी आढावा बैठक आयोजित केली होती. विज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे शेतकर्‍यांना वारंवार विजेचे प्रश्‍न भेडसावत असतात. त्यामुळे शेती उत्पन्नाचे प्रचंड नुकसान होत असते. शेतकर्‍यांचे विजेचे प्रश्‍न सुटावेत म्हणून विज वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांनी आपल्या कामाची गतीशिलता वाढण्याचेही यावेळी आ.कुणाल पाटील यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी तालुक्यातील विज पुरवठ्याच्या कामांबाबतचा आढावा जाणून घेतला. धुळे तालुक्यात मंजुर असलेल्या ५० नवीन ट्रान्सफार्मरची माहिती देण्याच्या सूचना आ. पाटील यांनी केल्या, त्यानुसार कार्यकारी अभियंता डी.डी.भामरे यांनी सांगितले कि, ५० ट्रान्स्फार्मर प्राप्त झाले असून त्यापैकी काही ट्रान्स्फार्मर मागणीनुसार बसविण्यात आले आहेत. तर उर्वरीत अतिरिक्त विजेचा दाब आहे त्या ठिकाणी बसविण्यात येणार आहे.

जिल्हा नियोजन समितीअंतर्गत मंजुर ट्रान्स्फार्मर व स्ट्रीट लाईटची कामांची त्वरीत निविदा काढून प्राधान्याने कामे सुरु करण्याच्या सूचना आ. कुणाल पाटील यांनी बैठकित दिल्या. तसेच ओ.टी.एस.योजनेंतर्गत आदिवासी वस्तीतील विजपुरठ्याच्या कामांची निविदा काढून ही कामे तत्काळ सुरु करण्याचेही आ. पाटील यांनी सांगितले.

वादळी पावसामुळे धुळे तालुक्यात अनेक ठिकाणी पोल उन्मळून पडले आहेत तर काही ठिकाणी तारा तुटूलेल्या आहेत. मात्र, अद्यापही त्यांच्या दुरुस्तीची कामे झाली नाहीत. ही कामेही सुरु करण्याचे सांगितले.

बैठकित उपस्थित शेतकरी व पदाधिकार्‍यांनी नवीन ट्रान्स्फार्मर तसेच वीजेचे पोल बसविण्याची मागणी केली. बाबरे ता. धुळे येथे आदिवासी वस्ती आंधारात होती, तेथे विज पुरवठा व्हावा म्हणून एकूण १५ लक्ष ९४ हजार रुपये मंजुर करण्यात आले असून हे काम लवकरच सुरु होईल, अशी माहिती आ पाटील यांनी दिली.

तर शेतकर्‍यांच्या मागणीप्रमाणे कृषी पंपासाठी (Agriculture pumps) नवीन ट्रान्स्फार्मर (Transformer) तसेच अतिरिक्त विजभार असलेला ट्रान्स्फार्मर विनाविलंब बसविण्याच्याही सुचना आ. पाटील यांनी यावेळी दिल्या.

दरम्यान धुळे (Dhule) तालुक्यातील शेतकर्‍यांच्या मागणीनुसार विजपुरवठ्यासाठी लागणार्‍या कामे व आवश्यक निधी याबाबतचा आराखडा तयार करुन जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत सादर करण्याचे आ. पाटील यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here