पालिकेच्या सायन रुग्णालयात  यशस्वी शस्त्रक्रिया

@maharashtracity

दरम्यान शास्त्रक्रिये नंतर या रुग्णाचे दोन्‍ही हात सामान्य पद्धतीने काम करत असून या रुग्णाच्या हातांच्या हालचालीसाठी डाॅक्टरांकडून फिजिओथेरपी दिली जात असल्याचे सांगण्यात आले. ३९ वर्षीय पुरुष एका रस्ते अपघातात जखमी झाला होता. त्या व्यक्तीचे हातांचा तळवा हातापासून वेगळा झाला होता. ही व्यक्ती सायन रूग्णालयात दाखल झाल्यावर १९ मे रोजी यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र शस्त्रक्रियेमुळे अपघातग्रस्ताच्या दोन्ही हातांनी लवकर हालचाल करण्यास सुरुवात केली आहे असे सायन रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. या शस्त्रक्रियेत इ वाॅर्ड मधील टीमने मोठी कामगिरी बजावली आहे. विभाग प्रमुख डॉ. जगनाथन, सर्जरी प्रमुख डॉ. अमर मुनोळी, डॉ. सारिका मयेकर आणि भूलतज्ज्ञ डाॅ. गीता पारकर यांच्या टीमसह अनेक डाॅक्टरांनी यात सहभाग घेतला होता. दरम्यान, ही सकारात्मक बाब असल्याची प्रतिक्रिया सायन रुग्णालयातील डाॅक्टरांनी दिली आहे.

दरम्यान शास्त्रक्रिये नंतर या रुग्णाचे दोन्‍ही हात सामान्य पद्धतीने काम करत असून या रुग्णाच्या हातांच्या हालचालीसाठी डाॅक्टरांकडून फिजिओथेरपी दिली जात असल्याचे सांगण्यात आले. ३९ वर्षीय पुरुष एका रस्ते अपघातात जखमी झाला होता. त्या व्यक्तीचे  दोन्ही हातांचे तळवे हातापासून वेगळे झाले होते. ही व्यक्ती सायन रूग्णालयात दाखल झाल्यावर १९ मे रोजी यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र शस्त्रक्रियेमुळे अपघातग्रस्ताच्या दोन्ही हातांनी लवकर हालचाल करण्यास सुरुवात केली आहे असे सायन रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. 

या शस्त्रक्रियेत इ वाॅर्ड मधील टीमने मोठी कामगिरी बजावली आहे.  विभाग प्रमुख डॉ. जगनाथन, सर्जरी प्रमुख डॉ. अमर मुनोळी, डॉ. सारिका मयेकर आणि भूलतज्ज्ञ डाॅ. गीता पारकर यांच्या टीमसह अनेक डाॅक्टरांनी यात सहभाग घेतला होता. दरम्यान, ही सकारात्मक बाब असल्याची प्रतिक्रिया सायन रुग्णालयातील डाॅक्टरांनी दिली आहे.

अपघातानंतर गेलेला वेळ, चेचलेल्या हातातील हाड आणि रक्त वाहिन्या जोडण्याचे आव्हान होते. रक्त वाहिन्या योग्य जोडल्यास जोडलेल्या हात सजीव होऊ शकणार होता. शिवाय संवेदना येण्यासाठी दोन नर्व्ह शिवाय ३० ते ३५ तंतू  जोडण्याचे आव्हान होते.– डॉ. अमर मुनोळी, सर्जरी प्रमुख. सायन हॉस्पिटल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here