Twitter : @maharashtracity

मुंबई

गेली कित्येक वर्षे मुंबई – गोवा महामार्ग सुधारत नसून तरीही कोकणात जाणारे चाकरमानी प्रवास करत असतात. या महामार्गाची सद्यस्थिती अतिशय दयनीय असून कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये या महामार्गावर खड्यांचे जाळे पसरले आहे. महामार्गाची चाळण झाली असल्याने प्रवासातील अडथळे दूर करण्यासाठी गणेशोत्सव, शिमगा, होळीच्या तोंडावर निवेदने दिली जातात. मात्र तरीही हा मार्ग त्याच स्थितीत आहे. त्यामुळे या मार्गावरील अडथळ्याचे शुक्लकाष्ट सुटावे, यासाठी केंद्रीय लघु उद्योग मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Union Minister Narayan Rane met CM Eknath Shinde) यांची भेट घेतली. गणेशोत्सवापूर्वी गोवा – मुंबई महामार्गावरील अडथळे दूर करून चाकरमान्यांचा प्रवास सुखकर करा, अशी मागणी नारायण राणे यांनी केली आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनातून मुंबई-गोवा मार्गाकडे (Mumbai – Goa Highway) लक्ष देण्याची मागणी केली आहे. राणे यांनी गणेशोत्सवादरम्यान या मार्गावर मोठी रहदारी असल्याचे सांगत संपूर्ण कोकण पट्टयात उत्साहाने व आनंदाने साजरा केला जाणारा गणेशोत्सव (Ganesh Festival) जवळ येऊन ठेपला असल्याचे राणे यांनी म्हटले आहे. मुंबई व परिसरात नोकरी व्यवसाय करणारे लाखो चाकरमानी कोणत्याही अडचणींना न जुमानता गणेशेत्सव साजरा करण्यासाठी कोकणातील (Konkan) आपल्या गावांकडे धाव घेतात. यासाठी मुख्यतः मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाचा (एन एच ६६) वापर करतात.

मुंबई गोवा महामार्गाची सद्यस्थित अतिशय दयनीय आहे. कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये या महामार्गावर खड्यांचे जाळे पसरले असून महामार्गाची चाळण झाली आहे. महामार्गाच्या या स्थितीमुळे राज्यभरातून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होणार असून अपघातही होऊ शकतात. ही स्थिती लक्षात घेऊन गणेशोत्सवसाठी कोकणात जाणाऱ्या व नंतर परतणाऱ्या प्रवाशांचा प्रवास विना अडथळा व सुरक्षित पार पडावा, यासाठी गणेशोत्सवाला सुरुवात होण्यापूर्वी तातडीने मुंबई – गोवा महामार्गाची दुरुस्तीसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत आदेश द्यावेत, असे राणे यांनी निवेदनात नमूद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here