केंद्राकडून लस पुरवठाची गरज

मुंबई: सध्या राज्याला केंद्राकडून काही दिवस आड अशा गतीने लस मिळत आहे. लस मिळण्यास सातत्य असल्यास राज्यातील लसीकरण कार्यक्रम पूर्ण क्षमतेने होऊ शकतो. केंद्रा कडे लस उपलब्ध असल्यास लसीकरण करण्यास अग्रेसर असलेल्या महाराष्ट्राला द्यावी. यामुळे संभाव्य तिसऱ्या लाटेला महाराष्ट्र सामोरे जाईल असे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

दरम्यान निर्बंध हटविन्याच्या मुद्द्यावर बोलताना टोपे म्हणाले की, शिथिलीकारणाचे लेव्हल करण्यात आले असून एक ते चार अशा लेव्हल करण्यात आल्या आहेत. यात महाराष्ट्रातील सर्व जिल्हे लेव्हल तीन वर आहेत. त्यामुळे राज्यात लेव्हल तीनचे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सध्या १० जिल्ह्यात ९२ टक्के पॉझिटिव्हीटी दर असून २६ जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. तसेच रोज ७ ते ८ हजारात रूग्ण आढळून येत आहेत. हे समाधानकारक बाब नसल्याचे टोपे म्हणाले. 

रुग्णसंख्या घटली पाहिजे. केरळ आणि उत्तर पूर्व राज्य महाराष्ट्र पेक्षा आघाडीवर असली तरीही निर्बंध शिथिल करण्याचे निर्णय मुख्यमंत्री, मुख्य सचिव, कोरोना टास्क फोर्स समिती सदस्य सुचवतील त्याप्रमाणे घेतला जाईल.  

दरम्यान सध्या दोन डोस घेतलेले दुकानदार निर्बंध हतविन्याची मागणी करत आहेत. मात्र सद्य स्थिती अनुकूल नसल्याचे सांगण्यात येत आहे. लसीकरण पूर्ण करण्यावर राज्याचा भर असून केंद्राने लस उपलब्ध करून द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here