@maharashtracity

नवी मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) कर्जत-जमखेडचे (Karjat – Jamkhed) आमदार आणि शरद पवार (Sharad Pawar) यांचे नातू रोहित पवार (Rohit Pawar) संचलित बारामती ॲग्रो (Baramati Agro) या संस्थेने कोकण (Kiman) विभागासाठी 24 ऑक्सिजन कॉन्संन्ट्रेटर (Oxygen Concentrator) दिले आहेत. संस्थेने हे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आज कोकण विभागाचे महसूल आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या हाती सुपूर्द केले.

महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांमध्ये एकूण 500 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर वाटप करण्याचे लक्ष या संस्थेने ठेवले असून आजपासून या कार्याचा प्रारंभ करण्यात आला आहे. कोकण विभागासाठी १ लिटर चे ७ आणि १० लिटरचे (प्रती मिनीट क्षमतेचे) १७ असे एकूण २४ ऑक्सिजन कॉन्संन्ट्रेटर देण्यात आले आहेत.

कोकण विभागातील पालघर (Palghar), रायगड (Raigad), रत्नागिरी (Ratnagiri), सिंधुदूर्ग (Sindhudurg) जिल्हयांतील ग्रामीण भागात ऑक्सिजन तुटवडा होऊ नये यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून, तसेच या ठिकाणी असलेल्या करोना काळजी केंद्रांमध्ये अचानकपणे गंभीर होणाऱ्या किंवा प्राणवायूची आवश्यकता भासणाऱ्या रुग्णांना तातडीने उपचार पुरवण्याच्या दृष्टीने या ऑक्सिजन कॉन्संन्ट्रेटरचा संजिवनी म्हणून उपयोग करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here