@maharashtracity

मुंबई: भाजपा आमदार आशिष शेलार (BJP MLA Ashish Shelar) हे उद्विग्न, भ्रमिष्ट झालेत. त्यांना भाजप पक्षात काही स्थान राहीलेले नाही. शेलार हे डोक्यावर पडलेले असून सत्ता गेल्याने ते तडफडत आहेत, अशी टीका मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी केली आहे.

भाजपा आ.आशिष शेलार यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याने महापौरांनी त्याचा समाचार घेत वरीलप्रमाणे टीका केली आहे.

Also Read: महापौरांबद्दल आक्षेपार्ह विधान; आशिष शेलार अडचणीत

आ. आशिष शेलार यांना आपण कोणाविषयी बोलतोय याची जाणिवच राहिलेली नाही. ‘महापौर कुठे xxx’ हा शब्द त्यांनी माझ्याबद्दल अनेकदा वापरला. हा एका महिलेचा अपमान आहे. महिलांचा अपमान करताना शेलार यांनी आपण एका महिलेच्या पोटातून जन्म घेतला आहे. बहीण, पत्नी या सर्व महिलाच आहेत, याचे भान त्यांनी ठेवले पाहिजे होते, अशा शब्दात महापौरांनी शेलार यांना सुनावले आहे.

तुम्ही कोणत्या xxx अंगाई गात होतात?

भाजप आ. आशिष शेलार यांनी, ‘मी xxx’, असा शब्द प्रयोग केला आहे. ते अस म्हणत असतील तर कोविड काळात तुम्ही कोणत्या xxx अंगाई गात होतात, उत्तर प्रदेशात ६० मुले ऑक्सिजनविना मृत्युमुखी पडली तेव्हा तुमच्या संवेदना कुठे गेल्या होत्या, असे प्रश्न महापौर किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केले.

त्या म्हणाल्या, आ. शेलार यांनी भ्रष्टाचाराबाबत (corruption) त्यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी घेऊन यावीत, त्यावर कारवाई केली जाईल. मात्र त्यांनी नुसते भौ भौ करू नये.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here