प्रकाश आंबेडकर आणि इम्तियाज जलील यांचा सवाल 

Twitter : @vivekbhavsar

मुंबई: भारतीय जनता पक्षाला सत्तेबाहेर ठेवण्याचा उद्देश समोर ठेवून महाविकास आघाडीमधील (Maha Vikas Aghadi) घटक पक्षांच्या नेत्यांच्या जोर बैठक सुरू झाल्या आहेत. मात्र, मुंबई महापालिका निवडणूक (BMC polls) स्वतंत्र लढविणार असल्याचे सुतोवाच करून कॉँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पाटोले (MPCC President Nana Patole) यांनी अपशकुन केला आहे. यामुळे भाजपला (BJP) पराभूत करण्याची भूमिका घेणाऱ्या आणि त्यासाठी तडजोड स्वीकारून महाविकास आघाडीत सहभागी होण्याची तयारी ठेवलेल्या प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांचा भ्रमनिरास झाला आहे. आम्ही महाविकास आघाडीचे सहयोगी पक्ष आहोत का? मविआ आम्हाला स्वीकारायला तयार आहे का? याचे स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी या दोन्ही नेत्यांनी केली आहे. 

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीने (MVA) राज्यातील पुढील सर्व निवडणूक एकत्र लढाव्या अशी भूमिका राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांच्यासह अजित पवार (AJit Pawar) आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी घेतली आहे. या नेत्यानी वारंवार याचा पुनरुच्चार देखील केला आहे. मात्र, नाना पटोले यांनी आज वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न केला. मुंबई महापालिका निवडणूक कॉंग्रेस स्वतंत्र लढली तर काय बिघडणार आहे, आम्ही यापूर्वी देखील अशी भूमीका जाहीर केली होती, असे वक्तव्य नाना पाटोले यांनी केल्याने महाविकास आघाडीच्या ऐक्याला सुरुंग लागला आहे. यावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी अत्यंत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. महाविकास आघाडी फुट सुरू झाली आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

महाराष्ट्रसिटी शी बोलताना बाळासाहेब आंबेडकर म्हणाले की त्यांचा वंचित बहुजन आघाडी पक्ष आजही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत आहे. पण भाजपला रोखायचे असेल तर मविआ मधील सर्व पक्षांनी एकत्र लढायला हवे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक स्वतंत्र लढायची आणि फक्त लोकसभा, विधानसभा निवडणूक एकतर लढायची ही कॉँग्रेसची भूमिका आम्हाला मान्य नाही. उद्धव ठाकरे यांना नाना पटोले यांची भूमिका मान्य आहे का हे त्यांनी स्पष्ट करावे, आम्ही महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहोत का, हे त्यांनी स्पष्ट करावे, त्यानंतरच आम्हाला कोणत्या जागा लढवायच्या आहेत, आम्हाला किती जागा हव्या, यावर चर्चा होईल, असे आंबेडकर यांनी स्पष्ट केले. 

एम आय एम पक्षाचे महाराष्ट्रातील नेते आणि औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यनीही तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. महाराष्ट्रसिटी शी बोलताना ते म्हणाले, आमच्यावर नेहमी आरोप होतो की आम्ही भाजपची बी टीम आहोत, भाजपला मदत करतो. पण आम्ही तर भाजपला पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडीला मदत करण्यास तयार आहोत. तडजोड करण्यास तयार आहोत. पण, आमचा एम आय एम हा पक्ष महाविकास आघाडीला चालणार आहे का हे त्यांनी स्पष्ट करावे, अशी मागणी जलील यांनी केली. त्यांच्या मंतदारसंघाबाबत बोलताना ते म्हणाले की, गेले चार वर्षे ते मतदारसंघात काम करत आहेत, जनतेची कामे करत आहेत. आता निवडणुकीच्या आधी कोणीतरी उठतो आणि निवडणूक जिंकू असा दावा करत असेल तर ते हास्यास्पद आहे, असा दावा जलील यांनी केला. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here