@maharashtracity

मुंबई: मुंबईत कोविड रुग्णांचे (covid patients in Mumbai) प्रमाण कमी झाले आहे. सोमवारपासून शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे आता मुंबई महापालिकेच्या (BMC) वैधानिक व विशेष समिती सभा व्हिडीओ कॉन्फरन्सिंग ऐवजी प्रत्यक्ष घेण्यात याव्यात, अशी मागणी भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे (Prabhakar Shinde) यांनी महापौर किशोरी पेडणेकर, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव आणि पालिका आयुक्त इकबालसिंग चहल (BMC Commissioner I S Chahal) यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर कमी झालेला आहे. प्रवाशांना लोकल ट्रेनमधून प्रवास करण्यास मुभा आहे. तसेच, मुंबईतील शाळाही सोमवारपासून सुरू झाल्या आहेत. मात्र महापालिकेच्या वैधानिक समिती सभा व विशेष समितीच्या सभा अद्यापही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे (Video Conferencing) घेण्यात येत आहेत.

या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सभेत कोण सदस्य काय बोलतो, हे स्पष्ट ऐकू येत नाही. तसेच प्रतिध्वनीही ऐकू येत असल्याने सभागृहात कोणता विषय मांडला, त्यावर कोण काय बोलले, अध्यक्ष यांनी काय निर्णय दिला याबाबत निटपणे माहिती मिळत नाही.

नगरसेवकांना त्यांच्या प्रभागातील समस्या मांडता येत नाहीत. कित्येक प्रस्तावांवर बोलण्याची संधी मिळत नाही. प्रस्ताव कधी मंजूर करण्यात आला तेच कळत नाही. त्यामुळे आता सदर सर्व बैठका व्हिडीओ कॉन्फरन्सिंग ऐवजी प्रत्यक्षपणे (Physical meetings) घेण्यात याव्यात, अशी मागणी प्रभाकर शिंदे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here