प्रदेश भाजपची तीव्र नाराजी

By Anant Nalavade

Twitter : @nalavadeanant

मुंबई: शिवसेनेची जाहिरात म्हणजे खोडसाळपणा होता, अशा शब्दात नाराजी व्यक्त करत असे प्रकार यापुढे टाळले पाहिजेत, असा सल्ला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी येथे शिवसेनेला म्हणजे अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्र्यांना दिला.

बावनकुळे म्हणाले, शिवसेनेच्या जाहिरातीत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची तुलना अचंबित करणारी आहे. मंगळवारी केलेला खोडसाळपणा दुरुस्त करण्याचा प्रयत्न आज झाला, मात्र पुन्हा असे होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. सेनेच्या जाहिरातीमुळे दोन्ही पक्षात थोडे मतभेद झाले, मात्र मनभेद नाहीत. दोन सख्ख्या भावांमध्ये देखील मतभेद होतात. शिवसेना आणि भाजप हे दोन स्वतंत्र पक्ष असल्यामुळे मतभेद होणे साहजिक आहे. मात्र हा विषय आता हा संपला आहे, असेही बावनकुळे यांनी यावेळी स्पष्ट केले.

बावनकुळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे यावेळी कौतुकही केले. फडणवीस भाजपाचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असून त्यांनी पाच वर्षे मुख्यमंत्री पदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली. त्यांनी राज्यात लाखो कार्यकर्त्यांना घडवले असून पक्ष वाढवण्यासाठी काम केले आहे. मात्र या जाहिरात प्रकरणामुळे भाजपच्या पदाधिकारी, आमदार, खासदार यांचे मन दुखावले आहे. शिंदे उत्कृष्ट आहेत पण त्यांची फडणवीस यांच्याशी तुलना योग्य नाही. परंतु हा विषय आता संपलेला आहे, असे सांगत बावनकुळे यांनी या वादावर पडदा टाकला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here