@maharashtracity

महाविकास आघाडीचे सर्व दावे ठरले फोल

धुळे: धुळे महानगर पालिकेच्या (DMC) महापौर पदावर अखेर भाजपाचे प्रदीप उर्फ नाना कर्पे यांची (Pradip Karpe of BJP won aw Mayor) बहुमताने निवड झाली.

भाजपच्या सर्वच्या सर्व ५० नगरसेवकांनी प्रदीप कर्पे यांच्या पारड्यात मते टाकली. तर काँग्रेसच्या (Congress) उमेदवार मदीना समशेर पिंजारी यांना १७ मते, एमआयएमच्या (MIM) उमेदवार सईदा अन्सारी यांना ४ मते मिळालीत. मात्र, ऐनवेळेला शिवसेनेच्या (Shiv Sena) उमेदवार ज्योत्स्ना पाटील यांनी माघार घेतल्याने महाविकास आघाडीमध्ये (MVA) एकमत नसल्याने समोर आले आहे. शिवाय, महाविकास आघाडी चमत्कार घडवेल, अशी चर्चाही फोल ठरली.

महापौर निवडीसाठी शुक्रवारी सकाळी ११ वाजता ऑनलाईन विशेष सभा घेण्यात आली. पीठासिन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी जलज शर्मा उपस्थित होते. समवेत मनपा आयुक्त देवीदास टाकळे, सचिव मनोज वाघ त्यांना मदत केली. यावेळी दमण येथून भाजपाचे सर्व नगरसेवक ऑनलाईन सहभागी झाले होते. तर सभागृहात महाविकास आघाडीमधील नगरसेवक उपस्थित होते.

सर्वात आधी उमेदवारांना माघारीसाठी वेळ देण्यात आली. यानंतर शिवसेनेच्या ज्योत्स्ना पाटील व अपक्ष उमेदवार मोमीन आसीफ अन्सारी यांनी माघार घेतली. त्यानंतर भाजपाचे प्रदीप कर्पे, काँग्रसेच्या मदीना पिंजारी, एमआयएमच्या सईदा अन्सारी या तिघे उमेदवारांसाठी निवडणूक घेण्यात आली.

यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मांनी प्रदीप कर्पेंच्या बाजूने मतदान घेतले. त्यांना दमण येथून तर सभागृहातील ५० नगरसेकांनी भाजपच्या कर्पेंना मतदान केले. तर काँग्रेसच्या उमेदवार मदीना पिंजारी यांना काँग्रेसचे ६, राष्ट्रवादीची ६ समाजवादी पार्टीची २, बसपाचे १, अशी १७ मते मिळालीत.

एमआयएमच्या उमेदवार सईदा अन्सारी यांना चार मते मिळालीत. यावेळी शिवसेनेच्या ज्योत्स्ना पाटील व बसपाच्या नगरसेविका सुशिला ईशी ह्या दोघेही तटस्थ राहील्यात. यानंतर जिल्हाधिकारी जलज शर्मांनी ५० मते मिळालेल्या प्रदीप कर्पेंना विजयी घोषित केले.

प्रदीप कर्पेंचे नाव महापौर म्हणून घोषित करताच महापालिकेच्या बाहेर भाजपच्या कार्यकर्त्यांनी ढोलताशांच्या गजरात एकच जल्लोष केला. यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, आयुक्त देवीदास टेकाळे, माजी मंत्री आ. जयकुमार रावल, माजी आ. राजवर्धन कदमबांडे, माजी महापौर चंद्रकांत सोनार, जिल्हा महानगराध्यक्ष अनुप अग्रवाल व नगरसेवकांनी कर्पेंचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

“धुळे शहराच्या विकासाचा रथ पुढे नेण्याचे काम भाजपाच्या माध्यमातून सुरु राहिल. सध्या डेंग्यूचा प्रश्‍न गंभीर असल्याने त्या प्रश्‍नावर आपला फोकस राहिल. त्याचबरेाबर देवपूरसह शहरातील रस्त्यांवरील खड्डे हा मुद्दादेखील अग्रभागी राहिल. शहराच्या विकासासाठी सदैव कटीबध्द राहू.”

  • प्रदीप कर्पे,
    महापौर, धुळे महानगर पालिका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here