By Sadanand Khopkar

Twitter: @maharashtracity

मुंबई/नाशिक: राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ हे देशाचे माजी पंतप्रधान आणि मंडल मसिहा व्ही.पी सिंह यांच्या जयंतीनिमित्त दि.२५ जून रोजी दिल्लीमधील कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत. (Chhagan Bhujbal to attend anniversary of V P Singh)

या कार्यक्रमाला जेडीयू खा. गिरिधरी यादव, सीपीआयचे डी राजा, डीएमके खासदार पी विल्सन, ज्येष्ठ ओबीसी विचारवंत प्रो. कांचा इलाई, बीएसपी खा. कूनवर दानिश अली, जे एनयु च्या माजी कुलगुरू डॉ. शेफालिका शेखर यांसह देशभरातील अनेक ओबीसी उपस्थित राहणार आहेत. मंडल आयोग, ओबीसी आरक्षण, जात निहाय जनगणना अशा विविध विषयावर छगन भुजबळ यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. या नेत्यांशी त्यांची इतर मागास वर्गाच्या प्रश्नांवर (issues of OBC community) चर्चा होणार आहे.

दिवंगत नेते शरद यादव (Sharad Yadav) आणि मुलायमसिंह यादव (Mulayam Singh) यांच्यानंतर ओबीसी समाजाचे राष्ट्रीय नेतृत्व भुजबळ यांनी करावे, अशी मागणी काही महिन्यांपूर्वी अनेक सामाजिक संघटना आणि नेत्यांनी केली होती. त्यास प्रतिसाद देताना छगन भुजबळ यांनी ओबीसी आणि मागास घटकासाठी आपण नेहमीच संघर्ष करत राहणारच आहोत, असे मत व्यक्त केले होते.

व्ही.पी सिंह यांच्या जयंतीनिमित्त दिल्लीच्या कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत “सामाजिक न्यायाचा वारसा” हा कार्यक्रम आयोजित केला आहे. Truth सिकर्स इंटरनॅशनल या संस्थेचे सुनिल सरदार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here